Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबादक्रीडा व मनोरंजन

कोरोना काळात लोककलावंतांना करुणा ग्रंथवाचक मंडळातर्फे किराणा कीट वाटप

औरंगाबाद/mh20live Network गेल्या अडीच महिन्यांपासून लाँकडाऊनमुळे शहरातील लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाहीर आणि ज्येष्ठ पत्रकार डाँ. शेषराव पठाडे यांनी ही बाब निदर्शनास आणून देताच सिडकोतील करुणा ग्रंथवाचक मंडळाने वाघ्या-मुरळी, तमाशा-लोकनाट्यातील ढोलकी वादक, पेटी वादक गायक कलावंतांना गहू-तादूळसह किराणा सामानाचे किट वाटप केले. सिडकोतील करुणा ग्रंथवाचक मंडळाच्या वतीने कोरोनाच्या भीषण संकटात समाजातील गोरगरीबांसह हातावर पोट असणार्यांना मदत केली जात आहे. ज्यांना मदत पोहोचवणे अशक्य आहे, अशा काही लोककलावंतांच्या खात्यांवर रोख स्वरुपात रक्कमही जमा केल्याचे औदार्य या मंडळाने दाखवले आहे. करुणा ग्रंथवाचक मंडळाचे सचिव राजेंद्र वाणी, आँडिटर संजय वाणी आणि त्यांच्या सहकार्यांनी आर्थिक मदतीसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. नंदनवन काँलनीतील लोकरंजन लोककला प्रतिष्ठानचे हर्मोनियमवादक सिद्धार्थ ढाले, ढोलकीवादक किशोर जोगदंड, गायिका रेखा कांबळे, सातारा (खंडोबाचे) येथील जयमल्हार वाघ्या-मुरळी मंडळाचे सुषमा मिसाळ, वंदना एंडोले, विमल हिंगे आदींना महिनाभर पुरतील एवढ्या जिवनावश्यक वस्तू मिळाल्याबद्दल त्यांनी राजेंद्र वाणी, संजय वाणी, डाँ. शेषराव पठाडे यांचे आभार व्यक्त केले. ………………………

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close