Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

हिवराआश्रम येथे 19, 20 डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी!; झेप साहित्य संमेलनाने गजबजणार स्वामी विवेकानंद नगरी!


बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः 19 व 20 डिसेंबरला हिवरा आश्रम (ता. मेहकर) येथे होणार्‍या 10 व्या अखिल भारतीय झेप साहित्य संमेलनाचे आकर्षण 20 डिसेंबरला सायंकाळी 4 ला होणारा लोककलावंतांचा लोकोत्सव ठरणार आहे.
या लोकोत्सवाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शाहीर कलावंत अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषाताई पवार, पुण्यनगरीचे औरंगाबाद येथील वरिष्ठ पत्रकार मनोज सांगळे, सत्यजित परिवाराचे संस्थापक श्यामभाऊ उमाळकर, मुळे फाऊंडेशनचे संस्थापक रमेशअण्णा मुळे, झेप कायदेविषयक सल्लागार समितीचे अ‍ॅड. संतोषराव झाल्टे, मुंबईचे एसीपी सचिन सावंत, अभिनेते आकाश पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या लोकोत्सवात शाहीर नाना परिहार, उत्तमराव जाधव, अभय मासोदकर, अरुण चव्हाण यांचा सहभाग असणार आहे. सूत्रसंचालन संजय पवार करणार असून, आभार इंगळे मानणार आहेत.
तत्पूर्वी 20 डिसेंबरला सकाळी दहाला हा उद्घाटन सोहळा होणार असून, मावळते संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे, मावळते स्वागताध्यक्ष सुरेशआप्पा खबुतरे, झेप पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा श्रीमती ए. बी. साळवे, अ‍ॅड. आम्रपाली कस्तुरे, स्वागताध्यक्ष शिवाजीराव घोंगडे, निमंत्रक पंढरीनाथ साळवे, आयोजक तथा झेप साहित्य चळवळीचे संस्थापक डी. एन. जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचवेळी मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरणही होणार असून, यात बुलडाणा लाइव्हचे संपादक संजय मोहिते, अ‍ॅड. विजयकुमार कस्तुरे, संजय टाकसाळे, बबन महामुने, छाया बैसाने-सोनवणे, दीपक सोनवणे, किरण डोंगरदिवे, राजेंद्र सपकाळ, टी. एस. चव्हाण, त्र्यंबकदादा बरकले यांना विविध क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी गौरविले जाणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close