Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

“ग्रंथालय व विद्यार्थी: सद्यस्थितीत आव्हाने”


ताज्या बातम्या साठी subscribers-MH20LiVE करा, बघत राहा www.mh20live.com

“कोविड १९” या संसर्गजन्य रोगामुळे भारतात लॉकडाऊन झाले,ऐन परीक्षेच्या तोंडावर आलेल्या संकटाला सर्वांनी मिळून तोंड दिले,त्या काळात परीक्षा झाल्यानाही.पण आता दहावी व बारावीच्या निकाळानंतरचे क्षेत्र निवडतांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. शहरात राहणारी ग्रामीण भागातील विद्यार्थी जी गावी गेली आहे,त्यांचे प्रवेश शहरात राहण्याची व्यवस्थाअश्या प्रश्न निर्माण झाले आहे. यातून शाळा, महाविद्यालय,विद्यापीठे यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमा नुसार पुस्तके,प्रात्यक्षिके,ऑनलाइन करण्याचे आव्हान आहे,मोठी यंत्रणा शासनाला उभी करावी लागेल असे चित्र स्पष्ट झाले आहे.ग्रंथालय हे खूप व्यापक आहे जगभरात देशात या विषयावर निरंतर विकास होत आहे.

आज डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांन पर्यंत पोहोचणे खऱ्या अर्थाने संधी आहे,
विद्यार्थ्यांनी ओळखावी आणि आपण शाळा,महाविद्यालय,विद्यापीठ देत असलेल्या ग्रंथालयाचे
ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा. त्याकाळात आर्थिक,आरोग्य,शैक्षणिक, प्रश्न आपल्या समोर उभे
राहिले आहे. या काळात आपल्या देशात व जगात सर्वत्र ग्रंथालय व शिक्षण क्षेत्रात खुप प्रगती केली आहे. ग्रंथालयातील सेवा सुविधा देत असतांना आताच्या काळातील डिजिटल ई-संसाधन पद्धतीचा उपयोग करावा लागणार आहे. ग्रंथालयाचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या विचारानुसार वाचक, पुस्तक,कर्मचारी यांची त्रिमूर्ती आवधारणा म्हणजे आपण वाचकाच्या गरजेनुसार माहिती पुरविणे.या तीन गोष्टीचा संगम आपल्याला करावा लागणार आहे.यात विद्यार्थी म्हणजेच वाचक देखील सक्रिय असला पाहिजे. सर्व शैक्षणिक संस्था देत असलेल्या ऑनलाईन सुविधांचा वापर करून आभ्यासक्रमनुसार ई- ग्रंथालयाची माहिती अद्यावत करावी. ई- ग्रंथालयाच्या स्वरूपात बदलत आहे,सर्व ई-पुस्तके,नियतकालिके,ई- पेपर,ई-पत्रिका, ऑडियो व्हिडीओ संग्रह,डेटाबेस,वेबसाईट्स,ई-नकाशा,२४३६५ दिवस सेवा यात प्रामुख्याने ई-सोर्सेसचा समावेश
आहे. आता संपूर्ण देशामध्ये वेबिनर ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन प्रत्येक विषयात होत आहे.
मात्र या सर्व तज्ज्ञांच्या व्याख्यानाची नोंद ग्रंथालयाने ठेवणे गरजेचे आहे. आपल्या वेबसाईटवर
ग्रंथालयाच्या सुविधांचा उल्लेख असावा. ई-संसाधनचे उपयोग सी ए एस, एस डी आय, डी डी एस,आय एल एल,ओ पी सी यांचा उपयोग प्रामुख्याने करता येईल. ग्रंथल्याची डेलनेट द्वारे आपल्या अणुज्ञान प्रमाणपत्र घ्यावे.आय पी आर म्हणजेच बौद्धिक संपदेचे अधिकार व नियम बौद्धिक संपदा आणि त्यातील बाबी, बौद्धिक संपदेचे संरक्षण, यासाठी मदत करणाऱ्या संस्था यांची माहिती घेणे आवश्यकआहे. तसेच ग्रंथालयाचे वार्षिक बजेट ,मानांकन, ग्रंथालयातील कर्मचारी सुद्धा कौशल्य पूर्ण तज्ञ व कुशल ग्रंथालयीन प्रबंधक असणे गरजेचे आहे. आधुनिक काळात मोठ्यात प्रमाणात माहितीसाठा तयार होत आहे. तेव्हा तो कमी वेळेत वाचकांपर्यंत योग्यरितीने पोहोचविणे हे कार्य ग्रंथालयाद्वारे करणे गरजेचे.तसे ग्रंथालयाचे काम सोपे नाही, यासर्व कार्य प्रणाली मागे एक टीम काम करत असते.आपल्या देशाच्या तुलनेत परदेशात ग्रंथालयातील प्रगती बघण्याजोगी आहे,कारण वाचकाला लागणारी माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून दिली आहे.


लॉकडाऊन च्या काळात सोशल मीडियावर ई-पेपर, ई-बुक ग्रंथालयाच्या संदर्भातील माहिती वाचकाची लक्षवेधी ठरली आहे.शहरी भागातील ग्रंथालय आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सेवा बजावतील,पण ग्रामीण भागातील ग्रंथालय सेवा देने कितपत शक्य आहे हे बघावे लागणार आहे.कारण आधुनिक सुविधांचा अभाव,ग्रंथालय कर्मचारी जागा अनेक ठिकाणी भरल्यानाही असे खूप ठिकाणी बघायला मिळते. सर्वात जास्त शिक्षण केंद्रे असलेला भारत हा तिसरा क्रमांकाचा देश आहे, भारताने शैक्षणिक,संशोधन,उद्योगात,डिजीटल क्षेत्र,अनेक क्षेत्रात प्रगती केली असून जगावर आपल्या बुद्धिमतेच्या कौशल्याचा जोरावर वेगळा ठसा उमटवला आहे.यात विद्यार्थ्यांनी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात अभ्यास काळजीपूर्वक करणे गरजेचे राहणार आहे,आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल,आयफोन असल्यामुळे डिजिटलग्रंथालयाचा वापर मोठ्याप्रमाणात होणार आहे.

सोमनाथ सुरडकर,औरंगाबाद.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close