Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

चला हात स्वच्छ धुवू.. करोनाला हरवू …!

चला हात स्वच्छ धुवू.. करोनाला हरवू …!

  दरवर्षी दि.15 ऑक्टोबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय हात धुवा दिवस” म्हणून साजरा केला जातो.  स्वच्छतेविषयी जाणीवा समृद्ध  व्हाव्यात व सुदृढ आरोग्यदायी जीवनासाठी हात धुण्याविषयी प्रभावी जागृती होण्यासाठी या दिवसाला विशेष महत्त्व आहे.  रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायतीमध्ये हात धुण्याची मोहीम सोशल डिस्टंसिंग ठेऊन केली जाणार आहे.  “नेहमी स्वच्छ हात धुवा व निरोगी राहा” असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

करोनाची साथ जगभरात थैमान घालत आहे.  याचा प्रतिबंध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना व शासकीय आरोग्य यंत्रणेकडून मुख्य उपाय सांगितला जातो तो म्हणजे हात धुवा.  साधा उपाय सर्दी, खोकला, फ्लू , स्वाइन फ्लू व झाला करोना विषाणू टाळण्यासाठी सांगितला जातो.  विशेषत: श्वसनमार्गाला आणि पचनसंस्थेला बाधित करणाऱ्या वायरस आजाराला टाळण्यासाठी हा रामबाण उपाय समजला जातो.  निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयी असलेली व्यक्ती दीर्घ आणि सुखी जीवन जगते.  आपल्याला होणाऱ्या अनेक आजारांचे मूळ हे अस्वच्छ हातामध्ये असते. अशुद्ध व अस्व्च्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्याने, खाल्ल्याने अनेक जीवणू आपल्या पोटात जातात.  त्यातून विविध प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळते म्हणून हाताच्या शुद्धीबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

हात कधी धुवावेत : स्वयंपाकाची तयारी करण्यापूर्वी, जेवणापूर्वी व जेवणानंतर,  जेवायला वाढण्यापूर्वी, शौचालयात जाऊन आल्यावर, आजारी व्यक्ती भेटल्यानंतर, खोकला, सर्दी झाल्यावर, नाक स्वच्छ केल्यानंतर, प्राण्याला हात लावल्यानंतर, केरकचरा काढल्यावर, बाहेरून आल्यानंतर, पैसे मोजल्यावर, केस विंचरल्यावर, सार्वजनिक वस्तूला हात लावल्यानंतर.

 जगभरात शाळकरी मुलांमध्ये हगवणीसारखे पोटाचे विकार अधिक प्रमाणावर आढळतात, याला कारण म्हणजे मुले अन्न खाताना हात स्वच्छ धूत नाहीत.  हात स्वच्छ न करता अन्नग्रहण केल्यामुळे पोटामध्ये विविध जंतू जाऊन होणाऱ्या आजारांमुळे दरवर्षी 35 लाख मुले दगावतात, असा निष्कर्ष काही अभ्यासकांनी नोंदविला आहे.  हात स्वच्छ असतील तर श्वसनाचे व पचनाचे विकार यांचे प्रमाण कमी होते. युनिसेफने याचा प्रचार करण्यासाठी विकसशील देशात अनेक उपक्रम राबविले आहेत.

 हात किती वेळ कसे धुवावेत :- शास्त्रीयदृष्ट्या किमान 20 ते 60 सेकंद हात चोळून  मग पाण्याने धुवावेत. यासाठी हात ओले करून घ्यावेत, मग हाताला पुरेसा द्रव साबण किंवा साबण डी लावून दोन्ही हात एकमेकात गुंतवून दोन्ही हाताला चोळून घ्यावा.  सगळीकडे नीट साबण लावल्यावर दोन्ही हाताचे तळवे, बोट, नखे हे सर्व चांगले चोळावे. बोटाच्या साध्यांचा भागातही  चांगले चोळावे त्यानंतर पाण्याने हात स्वच्छ धुवावेत आणि स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसून घ्यावेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयानुसार वीस ते पंचवीस सेकंद हात चोळले तर कीटक नष्ट होतात.

हाताची स्वच्छता ही आपल्या शारीरिक स्वच्छतेची पहिली पायरी आहे. हातापासूनच तर आपण रोजच्या कामांना सुरुवात करतो.  त्यामुळे स्वच्छतेच्या गोष्टी पुन्हा आपल्या अंगी बाळगा, आपल्या मुलांना शिकवा, त्यामुळे मुलांचे आणि आपले आरोग्य आपल्याच हातात राहील.  चला तर मग निर्धार करू या नियमित हात धुण्याचा-नियमित सदृढ राहण्याचा.

सुरेश पाटील माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ

जिल्हा परिषद रायगड

मो.9881712585

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close