Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

उद्योजकांना सुवर्णसंधी उद्योजकांकरीता काय आहेत विविध कर्ज योजना… जाणून घेऊ या 

राज्यातील इतर मागासवर्गीय समाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील इतर मागासवर्गीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु. 1.00 लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व 20 टक्के बीज भांडवल योजना. तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष पर्यत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. 10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे. सन 2020-21. या वित्तीय वर्षाकरीता विविध कर्ज योजनांचे रायगड जिल्हा कार्यालयास उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

थेट कर्ज योजना (भौतिक उद्दीष्ट-120) व 20 टक्के बीज भांडवल योजना ( भौतिक उद्दीष्ट-6) या योजनांचे अर्ज जिल्हा कार्यालयात स:शुल्क उपलब्ध आहेत.

रु.1.00 लक्ष थेट कर्ज योजना– सिबील क्रेडीट स्कोर किमान 500 असलेल्या लाभार्थीना हे कर्ज महामंडळातर्फे दिले जाते. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षे आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा 18 ते 55 वर्ष असावे, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज आकारण्यात येणार नाही. मासिक हप्ता रु. 2 हजार 085 इतका आहे.

20 टक्के बीज भांडवल योजना – कर्जाची उच्चतम मर्यादा रु. 5.00 लक्ष पर्यत. कर्ज परतफेडीचा कालावधी 5 वर्षे आहे. अर्जदाराच्या वयाची मर्यादा 18 ते 50 वर्षे आहे. बँकेमार्फत लाभार्थीना 75 टक्के कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये लाभार्थांचा सहभाग 5 टक्के, महामंडळाचा सहभाग 20 टक्के, बँकेचा सहभाग 75 टक्के महामंडळाच्या कर्ज रक्कमेवर व्याजाचा दर 6 टक्के असतो.

या योजनांच्या लाभासाठी आवश्यक सर्वसाधारण कागदपत्रे – पासपोर्ट साईज 2 फोटो, तहसिलदार, नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मूळ दाखला. (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1.00 लक्ष.), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (इ.मा.व ), दरपत्रक (कोटेशन), प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिकेची झेरॉक्स, सिबील क्रेडीट रिपोर्ट- थेट कर्ज योजनेकरीता (स्कोर किमान 500 असावा), स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल किंवा रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किंवा संबंधित जागामालकाचे संमती पत्र व व्यवसायाच्या जागेचा असेसमेंट उतारा इ. कागदपत्रे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (भौतिक उद्दिष्ट-140) व गट कर्ज व्याज परतावा योजना (भौतिक उद्दिष्ट-25) या योजनांकरिता महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळाला भेट देवून ऑनलाईन अर्ज दाखल करता येईल.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.10.00 लक्ष पर्यत) – ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनेमध्ये बँकेने रु.10.00 लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (12 टक्के मर्यादित) अर्जदाराच्या आधारलिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. या योजनेचा कालावधी 5 वर्ष असेल. या योजनेसाठी अर्जदाराचे वय 18 ते 50 असावे, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.8.00 लक्ष पर्यत (सक्षम प्राधिकरणाने वेळीवेळी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार), कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. अर्जदाराचे आधार संलग्न बँक खाते असणे अनिवार्य, महामंडळाच्या www.msobefdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. अर्जदारास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.

 गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10.00 लक्ष ते 50.00 लक्ष पर्यंत) :- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषानुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचतगट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम2013 अंतर्गत), LLP, FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थाना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारणीकरिता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.               

कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8.00 लक्ष पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु. 10.00 लाख ते रु. 50.00 लाखपर्यंत मंजूर उद्योग उभारणीकरिता कर्ज उपलब्ध केले जाईल.  गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 पर्यंत असावे, गटातील सर्व सदस्यांचा सिबिल केडीट स्कोअर किमान 500 इतका असावा, परतफेडीचा कालावधी मंजूर कर्जावर 5 वर्षांपर्यत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल तो, कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर (जास्तीत जास्त 12 टक्के व्याजदराच्या आणि रु. 15.00 लाखाच्या मर्यादेत) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.msobcfdc.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent) दिले जाईल, गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.

जिल्ह्यातील इच्छुक, गरजू इतर मागस वर्गीय (ओ.बी.सी.) प्रवर्गातील व्यक्तींनी योजनेच्या अधिक माहितीसाठी www.msobefdc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.   तसेच शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लिमिटेडचे जिल्हा कार्यालय, श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या., सदनिका क. 101, पहिला मजला, चेंढरे, अलिबाग, (दूरध्वनी क्र.-02141-224448) अथवा ई-मेल आयडी-[email protected] येथे शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नि.व.नार्वेकर यांच्याशी संपर्क साधावा.

   मनोज शिवाजी सानप   जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close