Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

विकास कामांचा अनुशेष भरून काढू नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सातारा देवळाई येथे भूमिपूजन

संभाजीनगर (ता. १३) :  कोविडमुळे मध्यंतरी फारशी कामे करता आली नाहीत. तरी तुमच्या आमदाराने पन्नास कोटींचा निधी खेचून आणला. त्यातून विकास कामे होत आहेत. पुढेही होतील. आता विकास कामांचा अनुशेष भरून निघेल, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सातारा देवळाई भागातील विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण समारंभात दिली.
सातारा देवळाई भागातील विकास कामांसाठी राज्य सरकारकडून पंधरा कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील विकास कामांचे भूमिपूजन तसेच याआधी मिळालेल्या निधीतून पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी झाले. हायकोर्ट कॉलनी येथे आयोजित या समारंभात व्यासपीठावर कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, आमदार संजय शिरसाट, आमदार अंबादास दानवे, मनपा प्रशासक आस्तिककुमार पांडेय, विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट, तुषार शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृहनेता विकास जैन, नगरसेवक सिदांत शिरसाट, शहरप्रमुख विजय वाघचौरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी सातारा आणि देवळाई भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यांना उद्देशून नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले, तुमचा आमदार खूप हुशार आहे. विकास कामांसाठी निधी कसा मिळवायचा हे त्याला ठाऊक आहे. म्हणूनच या भागातील कामे मार्गी लागत आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेतही या भागाचा समावेश झाला आहे. संभाजीनगर हे शिवसेनाप्रमुखांचे आवडते शहर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संभाजीनगरवर विशेष लक्ष आहे. म्हणूनच त्यांनी या शहरासाठी राज्यातील सर्वात मोठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. गुंठेवारीतील घरेही नियमित करण्याचा निर्णय घेतला. यापुढेही तुमचा बॅकलाॅग भरून काढू, असे आश्वासन यावेळी शिंदे यांनी दिले.
निवडणुकीत खूप त्रास झाला
विधानसभा निवडणुकीत सातारा देवळाईवरुन आपल्या खूप त्रास झाल्याचे आमदार शिरसाट यांनी सांगितले. ते म्हणाले, निवडणुकीवेळी मला प्रत्येक जण सातारा देवळाईवरुनच बोलायचा. त्यावेळी खूप त्रास झाला. त्याचवेळी मी सांगितले की तुमच्या भागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. त्यानुसार आता विकास कामे सुरू आहेत. मनपा या भागात एक रुपया खर्च करत नाही. राज्य सरकारकडून मीच निधी आणून कामे केली. पण त्या कामांना एनओसी देण्यासाठीही महापालिकेचे अधिकारी त्रास देतात, अशी खंत यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्याचे लाडके नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी सातारा-देवळाई या भागाच्या विकास कामे करण्यासाठी आमदार संजय शिरसाट यांना ५० कोटी रुपये निधी मंजुर करुन दिला.या मंजुर करुन दिलेल्या ५० कोटींचा निधीमधुन याआधी सातारा-देवळाईमध्ये १० कोटीचे दर्जेदार असे रस्ते तयार होवुन कामे पूर्ण झालेले आहे. आणि आज मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याहस्ते १५ कोटींचा कामांचे भुमिपुजन झाले. भुमिपुजन झाल्यावर लगेच कामादेखील सुरुवात होणार आहे. व पुढील २५ कोटींच्या कामाचे उद्घाटन लवकरच भुमिपुजन होणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close