Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

मतदार जनजागृतीसाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करु या -उपजिल्हाधिकारी वैशाली माने


अलिबाग,जि.रायगड,दि.1
9:- दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस “राष्ट्रीय मतदार दिवस” म्हणून साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर यावर्षी 11 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येत असून, मतदार जनजागृतीसाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करु या, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या नियोजनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात विविध शासकीय विभागांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस उपजिल्हाधिकारी श्रीमती माने यांनी राष्ट्रीय मतदार दिवसाचे महत्व विषद करताना मा.निवडणूक आयोगाच्या सूचनांबद्दल उपस्थित सर्वांना माहिती दिली. प्रत्येक कार्यालयात “मतदार जागृती फोरम” कार्यान्वित करुन त्या माध्यमातून मतदार जनजागृती, नव मतदार नोंदणी याबाबत जास्तीत जास्त प्रयत्न व्हावेत तसेच समाजातील सर्व स्तरांमध्ये मतदार जागृती होणे अपेक्ष्‍िात आहे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणा व विभाग राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहाने साजरा करतील. सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नातून मतदार जागृती उत्तमरित्या होईल, असा विश्वास श्रीमती माने यांनी शेवटी व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक किर्ती शेडगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, सहाय्यक निबंधक डॉ.स्मिता गायकवाड, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास श्री.शा.गि.पवार, सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजीव तांभाळे, गट विकास अधिकारी दिप्ती देशमुख, अप्पर कोषागार अधिकारी दिपक राऊळ, क्रीडा अधिकारी सचिन निकम, समाज कल्याण विभागाचे अनिल मोरे, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अधीक्षक श्री.लालचंद कुंभार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी चंद्रकांत जाधव, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आझाद जाधव, सहायक गट विकास अधिकारी कैलास चौलकर, दुय्यम निबंधक पराग भातखंडे, उप वन संरक्षक कार्यालय अधीक्षक श्री.परतेकर, अजित पवार, सहायक प्रकल्प अधिकारी राजाराम मोरे, जिल्हा हिवताप कार्यालयाचे श्री.वर्तक यांची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close