Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

सर्व मतदार बनू..“सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक” विविध कार्यक्रमांनी “राष्ट्रीय मतदार दिवस” होणार साजरा

अलिबाग,जि.रायगड,दि.24 :- मा.भारत निवडणूक आयोग व मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे दरवर्षी प्रमाणे दि.25 जानेवारी, 2021 रोजी 11 वा “राष्ट्रीय मतदार दिवस” हा साजरा केला जातो.

या वर्षी मा.भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार   सर्व मतदार बनू… “सशक्त, सतर्क, सुरक्षित आणि जागरुक”  सभी मतदाता बने… सशक्त, सतर्क, सुरक्षित एवम् जागरुक” Making Our Voters… “Empowered,Vigilant, Safe & Informed”  हे मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतील घोषवाक्य ठेवण्यात आले आहेत.

“राष्ट्रीय मतदार दिवस” या निमित्ताने जिल्हा स्तरावर, मतदारसंघ स्तरावर, तालुका स्तरावर व मतदान केंद्र स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी जनजागृती EVM/WPTs जनजागृती बाबत चित्रफित दाखविणे, निवडणूक साक्षरता क्लबच्या माध्यमातून नवीन व भावी मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देणे, नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना त्यांचे डिजिटल स्वरुपातील मतदार ओळखपत्र हे https://nvsp.in व  https://voterportal.eci.gov.in या संकेतस्थळावरुन किंवा  Voter Helpling Mobile app वरुन डाऊनलोड करण्यास प्रोत्साहन देणे, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून मा.भारत निवडणूक आयोगातर्फे e-EPIC प्रणालीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे सोमवार, दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 8.30 वा. जिल्हाधिकारी निवासस्थान येथून मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने दि.25 जानेवारी, 2021 सकाळी 9.00 वा. नियोजन भवन सभागृहात राष्ट्रीय मतदार दिवसाची प्रतिज्ञा घेणे, नवीन नोंदणी झालेल्या मतदारांना मा.भारत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी (Proved to be a Voter-Ready to Voter) ही घोषवाक्य लिहिलेले बॅचेस व e-EPIC देणे, मतदारयादी संदर्भात उत्कृष्ठ काम केलेल्या मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (Booth Level Officer) प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणे, EVM/WPAT मतदार नोंदणी मतदार जनजागृती व अपंग मतदार याबद्दलच्या भारतीय निवडणूक आयोगाकडील चित्रफिती विविध कार्यक्रमांद्वारे दाखविणे, अशा विविध  कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यात एकूण 23 लाख 19 हजार 746 मतदार असून यापैकी 11 लाख 79 हजार 797 पुरुष मतदार असून  स्त्री मतदार 11 लाख 39 हजार 939 आहेत  तर  इतर मतदारांची संख्या 10 आहे.  जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी 11 व्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने महिला, युवक, अपंग व्यक्ती, जेष्ठ नागरिक यांचा मोठ्या संख्येने या कार्यक्रमात समावेश करुन घेण्यात येणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती वैशाली माने यांनी रविवार, दि.24 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close