Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

कामं झाले कमी ! म्हणून मिळेना रोजगाराची हमी !

तालुक्यात 91 ग्रामपंचायती ; 10 ग्रामपंचायतीतचं कामं ; 62 हजार जॉबकार्ड ; 137 मजूर कामावर..!

mh20live Network

माजलगाव :रविकांत उघडे

कोरोनाच्या सावटाखाली दबलेला ग्रामीण भागातील मजूर हाताला कामं नसल्याने हताश झाल्याचे चित्रं सर्वत्र पहावयास मिळत आहे.ग्रामीण भागामध्ये पर-राज्यात ऊसतोडणीस गेलेले बरेच मजूर गावी आले असून काहींना क्वारंटाइन करण्यात आले तर अर्धे गावाबाहेर क्वारंटाइन केले आहेत.त्यांचा कालावधी संपला की ते देखील गावात दाखल होतील परंतु त्यांच्या हाताला कामं नसणार त्याचं काय ? अशा विवंचनेत त्या मजूरांची घालमेल सुरु झालीय. त्यात शेत मशागतीस ग्रामीण भागात यंत्राचा वापर होत असल्याने यंदा खरिपाची पेरणीपूर्व मशागतीचे काम ही अशी तशीच जाणार असल्याने शेत मशागतीतून मिळणाऱ्या रोजगारावर देखील संकट आले आहे. तालुक्यात ग्रामपंचायतीची कामांची मागणी सध्या कमी झाली असून गावागावांमध्ये कामं सुरु झाली की मजुरांची मागणी वाढणार परंतु चौथ्या टप्प्यात देशात लॉकडाऊन असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागात याची कडक अंमलबजावणी केली असल्या कारणाने मजुरांच्या हाताला काम नसल्याने रोजगार कमी झाला असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात 62 हजार 748 जॉबकार्ड धारक त्यापैकी 29,443 महिला मजूर असून यापैकी 9 हजार 163 अँक्टीव लेबर संख्या आहे.तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमांतून 137 मजुरांच्या हाताला काम मिळाले असल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बळीराम चव्हाण यांनी बोलतांना दिली. माजलगाव तालुक्यातील 91 ग्रामपंचायती असून सध्या मनरेगाची कामं ही फक्त 10 ग्रामपंचायतीच्या माध्यमांतून सुरु असून इतर ग्रामपंचायतीने संबधित विभागाकडे कामासाठी मागणी केली तर मजुरांच्या हाताला कामं मिळतील व रोजगाराचे संधी उपलब्ध होतील.तालुक्यात ऊसतोड मजूर हजारोंच्या संख्येने परराज्यातून दाखल झाले असून अद्यापही तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीने काम मिळण्यासाठी मागणी केली नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.आता तरी ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांनी पुढाकार घेवून काम उपलब्ध करुन देत मजुरांची उपासमार होणार नाही याची वेळीच दक्षता घ्यावी.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close