Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

बिबट्या नागरिकांना दिसतो, वन अधिकाऱ्यांना दिसत नाही,”विहामांडवा परिसरात शेतकरी झाले भयभीत”


   विहामांडवा युनूस पठाण :

विहामांडवा परिसरात गेल्या आठ दिवसापासून बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. शेतीचे कामे खोळंबली आहेत. यामुळे खरीप हंगामातील काढणीस आलेली पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांना खूप कसरत करावी लागत आहे. थोड्याफार प्रमाणात आलेला कापूस वेचणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळेना, यामध्ये भुरटे चोर कापूस वेचणीचा डाव साधत आहे, बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना मजूर मिळेना. कारण मागील पंधरा दिवसांपूर्वी अपेगाव परिसरात बाप लेकाचा बिबट्याच्या हल्ल्यात जीव गेला. विशेष म्हणजे, विहामांडवा ,नवगाव ,आपेगाव ,केकत जळगाव, वडजी ,थेरगाव ,कोळीबोडखा परिसरातील शेतकऱ्यांना बिबट्या दिसतोय, परंतु वन अधिकाऱ्यांना बिबट्या दिसत नाही , त्यामुळे बिबट्याला पकडने वनाधिकाऱ्यांना खूप मोठे आव्हानच झाले आहे,याचे कारण म्हणजेच वन अधिकाऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क होईपर्यंत कधी फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असतो ,तर कधी व्यस्त दाखवतो, तर कधी नॉटरिचेबल दाखवतो ,जर संपर्क झालाच तर ,वन अधिकारी बिबट्या दिसणाऱ्या जागेवर अधिकारी पोहोचेपर्यंत बिबट्या तेथून आपली जागा बदलतो ,त्यामुळे परिसरामध्ये अधिकाऱ्यांनी वास्तव्यास राहावे अशी नागरिकांमध्ये चर्चा ऐकावयास मिळत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती कामे करण्यासाठी भीती कमी निर्माण होईल, व हिम्मत येईल व वन अधिकाऱ्यांना बिबट्या पकडण्यास यशही मिळेल, तसेच हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांच्या पदरात पडेल. तसेच शेतकऱ्यांनी आपला जीव मुठीत धरून शेतामध्ये रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्या केले आहे .त्या पिकांना पाणी देण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे शेतकरी रात्री आपला जीव मुठीत धरून पिकांना पाणी देण्याचे काम करत आहे. त्याकरिता महावितरण कंपनीने तरी शेतकऱ्यांना दया दाखवून दिवसाच लाईट द्यावी ,दिवसाचे भारनियमन रद्द करावे. अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे,

महावितरण कंपनीने दिवसाचे भार नियम रद्द करून शेतकऱ्यांना बिबट्याची भीती असे पर्यंत दिवसा लाईट द्यावी, तसेच वन अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी बिबट्या दिसणाऱ्या परिसरामध्ये वास्तव्यास राहावे, कारण अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्यास वेळ लागतो, तोपर्यंत बिबट्या जागा बदलतो, त्यामुळे बिबट्या त्यांना दिसत नाही,तसेच बिबट्या पकडण्यास यशही मिळेल,””   व्यापारी महासंघ, राजेंद्र पन्हाळकर,समाजसेवक, नितीन ब्रह्मराक्षस    

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close