Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

विधान परिषद : सेनेकडून उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी तर राष्ट्रवादीकडून खडसे

मुंबई : काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचे नाव विधान परिषदेसाठी घेतले जात होते, पण कुठला पक्ष त्यांना उमेदवारी देणार हे काही स्पष्ट झाले नव्हते. अखेर शिवसेनेकडून मातोंडकर यांचे नाव विधान परिषदेसाठी सुचवण्यात आले आहे.विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावं सुचविण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 4 – 4 नावं पुढे आली आहेत.

शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे वृत्त आहे. काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, अनिरुद्ध वनकर आणि मुझफ्फर हुसेन या नावांची शिफारस करण्यात येणार आहे, तर राष्ट्रवादीकडून भाजपमधून आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव सुचवण्यात आले आहे. याशिवाय राष्र्ट्रवादीने राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे या नावांची शिफारस केल्याचं समजते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर जेमतेम पाच महिने पक्षात राहिल्या. मुंबईतून निवडणूक हरल्यानंतरही काही काळ त्या काँग्रेसमध्ये कार्यरत होत्या. त्यांनी पक्षातील अंतर्गत राजकारणाला वैतागून त्यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या जागांची चर्चा सुरू झाल्यानंतर उर्मिला यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. शिवसेना मातोंडकर यांच्या नावाची विधान परिषदेसाठी शिफारस करणार असल्याच्या बातमीला शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दुजोरा दिला होता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close