Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सिल्लोड तालुक्यातील 102 ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जाहीर

अनेकांना नारड तर काही जण अजूनही मैदानात


सिल्लोड/ प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यातील 102 ग्रामपंचायत च्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दी ८ मंगळवार रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे  परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी श्रीमती पूजा पाटील, तहसीलदार श्री विक्रम राजपूत, नायब तहसीलदार संजय सोनवणे, विनोद करमनकर, संतोष परदेशी अ का,विनोद धोकटे, प्रभाकर दौड विस्तार अधिकारी, श्री इंगळे विस्तार अधिकारी, राजेंद्र निकम कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी, दत्ता साळवे, राजेश बसैय्ये यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.या आरक्षण सोडतीमुळे अनेक विद्यमान सर्पणचाच्या हाती नारळ मिळाला असून काही जण अजूनही मैदानात आहे तर जाहीर झालेला आरक्षण सोडतीमुळे अनेक नवीन भावी सरपंचांना संधी मिळणार आहे.सिल्लोड तालुक्यातील सन 2020 ते 2025 या कालावधीत येणारे सरपंच पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे
अनुसूचित जाती महिला……..सारोळा,मादणी/वडाळी, अनाड,पेंडगाव,वरखेडी/भायगाव,
अनुसूचित जाती सर्वसाधारण…….वसई जळकी,मोढा खुर्द,पिंपळगाव पेठ,वडाळा,पिंप्री वरुड,
अनुसूचित जमाती महिला……चिंचपूर,शिवणा,घाटनांद्रा,खंडाळा,चांदापुर,
अनुसूचित जमाती सर्वसाधारण……..मुकपाठ,आसडी,जळकी घाट / बोजगाव,बहुली,सराटी,
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला………केळगाव/ आधारवाडी,दहिगाव,पालोद,मांडणा,जळकी वसई,बोरगाव कासारी,खुल्लोड/विरगाव,हट्टी/मोहाळ,रहिमाबाद,रेलगाव,कायगाव,गव्हाली,पिरोळा/डोईफोडा,मांडगाव,
नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण……..डिग्रस,अन्वी,पानवदोड खुर्द,डोंगरगाव,पिंपळगाव घाट/शेखपूर,सावखेडा बु /सावखेडा खु,धारला,केऱ्हाळा,निल्लोड,गोळेगाव बु,हळदा/ डकला,बोरगाव बाजार,तळणी,सिरसाळा तांडा,
सर्वसाधारण महिला……….भवन,वांगी खु,अंभई,जांभई,आमसरी,सिसारखेडा,वांगी बु,टाकळी खु,गव्हाली तांडा,सासुरवाडा,धावडा/चिंचवण,बाभूळगाव,खुपटा,मंगरूळ,लिहाखेडी,शिंदेफळ,गेवराई शेमी,मोढा बु,आमठाणा,अंधारी,खेडी लिहा,धोत्रा, धानोरा / वांजोळा,तलवाडा,बोदवड,जळकी बाजार,अजिंठा,
सर्वसाधारण………पांगरी,वाघेरा/नाटवी,गोळेगाव खु,घटांब्री,चिंचखेडा,वदोडचाथा,लोणवाडी,कोटनांद्रा,पानवडोद बु,सिरसाळा,दिडगाव,चारनेर/ चारनेरवाडी,बाळापूर,भराडी/कुतुबपूर,वरुड खुर्द,म्हसला बु,पळशी,बनकिन्होळा,देऊळगाव बाजार,उंडणगाव,कासोद/धामणी,टाकळी जिवरग,खातखेडा/धोंडखेडा,पिंपळदरी,म्हसला खु,बोरगाव सारवाणी,उपळी.

काहींना विद्यमान सरपंचांना नारळ तर काही अजून मैदानात……सिल्लोड तालुक्यातील 102 ग्रामपंचाईतचे आरक्षण सोडत जाहीर झाले असून यात अनेक विद्यमान सरपंच व गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक पुढाऱ्यांच्या हाती आरक्षण सोडत मुळे नारळ मिळाला तर काही जण अजूनही मैदानात असून अनेक जणांना बाहेर पडावे लागणार आहे किंवा ईतर ठिकाणी आपलं बस्तान बसविण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.यामुळे काही ठिकाणी नवीन पुढार्यांना संधी मिळणार असल्याने इच्छुक भावी सरपंचांना दिलासा मिळाला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close