Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

जाणून घ्या जांभूळ खाण्याचे आरोग्यदायक फायदे

ताज्या बातम्या साठी subscribers-करा,MH20LiVE बघत राहा www.mh20live.com

जांभूळ हे एक रसरशीत असं छोटं गर्द जांभळ्या रंगाचं फळ आहे. ‘सिझिग्विम क्युमिनी’ असं शास्त्रीय नाव असलेलं हे मार्टासिए वर्गातील सदाहरीत झाडाचं फळ. जांभळाचं लाकूड हे जलरोधक व मजबूत असतं त्यामुळे बांधकामात व इतर ठिकाणी ते वापरलं जातं. जांभळापासून व्हिनेगर व वाईनही बनवतात. हे फळ आकाराने लांबट-गोलाकार असून फळाची चव आंबट-तुरट, गोड, थोडी जिभेला झिणझिण्या आणणारी असते.

जांभळाचे आरोग्यदायी फायदे…
जांभळामध्ये असलेल्या मधुमेहविरोधी गुणधर्मामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. जांभळामुळे रक्तातील स्टार्च आणि साखरेचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते.
जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो.
जांभळाच्या झाडाच्या सालाची आणि बियांची पावडर पोटाच्या विकारावर गुणकारी असते. डायरिया, अपचन, जुलाब यांसारख्या आजारात ती फायदेशीर ठरते.
पांडुरोग व कावीळ झालेल्या रुग्णांसाठी जांभळं हितावह असतात.
जांभळाच्या रसामुळे पोटाच्या तक्रारी दूर होतात. पण ते वातकारक असल्याने जपून खावे.
उन्हाने उष्णतेचा त्रास होत असल्यास जांभूळ खाल्ल्यावर तरतरी येते.
जांभळाच्या झाडाच्या सालीची राख ही दातांसाठी चांगली असते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. mh20live.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close