Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

पहिली वैयक्तिक कोव्हीड लाइफ विमा पॉलिसी सुरू

विमा कंपनीचे उद्दिष्ट पॉलिसीधारकांना सध्याच्या साथीच्या आजारांविरूद्ध त्यांची बचत संरक्षित करण्यात मदत करणे आहे

कोल्हापूर : कोव्हीड-19 च्या निदानाच्या आर्थिक परिणामापासून लोकांच्या स्वप्नांना आणि आकांक्षा सुरक्षित करण्यासाठी एडलवाइस टोकियो लाइफ इन्शुरन्सने आज कोव्हीड शिल्ड + ही भारताची पहिली वैयक्तिक कोव्हीड-19 जीवन विमा उत्पादन बाजारात आणण्याची घोषणा केली. उत्पादनांच्या नावीन्यपूर्णतेच्या परंपरेनुसार राहून, जीवन विमा उतरवणा-यांना खासगी आरोग्य सेवांच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढीबद्दल आणि चालू साथीमुळे आर्थिक अनिश्चितता वाढल्यामुळे लोकांसाठी त्यांच्या खिशांना परवडेल अश्या किमतीत हे उत्पादन बाजारात आणले.

कोव्हीड शिल्ड + आरोग्य उद्योगातील नवीन उत्पादन जे साथीच्या आजारामुळे लोकांना उद्भवणार्‍या संरक्षणाच्या गरजा पूर्ण करतात त्यासाठी उपयुक्त आहे. 1 वर्षाचा कार्यकाळ असणारे हे उत्पादन अत्यंत गंभीर आजाराचा लाभ देतात, एक मुदत विमा, कमी खर्चिक असते आणि कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय त्यावर त्वरित निर्णय घेता येते.

प्रॉडक्ट लॉन्चबद्दल टिप्पणी देताना एडलवाइस टोकियो लाइफ इन्शुरन्सचे कार्यकारी संचालक सुभ्रजित मुखोपाध्याय म्हणाले, “बदलत्या ग्राहकांच्या गरजेनुसार आम्ही नेहमीच नवीन नावीन्यपूर्ण इन्शुरेंस प्लानची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या अलीकडील ग्राहकांच्या संवादांद्वारे आम्हाला हे जाणवले की विपरीत आर्थिक परिणामामुळे हा आजार आणखीनच त्रासदायक बनला आहे. लोक घाबरत आहेत की कोव्हीड निदानानंतर त्यांच्या बचतीमध्ये व्यत्यय येईल आणि म्हणूनच त्यांची दीर्घकालीन आकांक्षाला तडा जाईल. आम्हाला कोव्हीड शिल्ड + च्या माध्यमातून आमच्या ग्राहकांकडून असलेली ही काळजी दूर करायची आहे आणि त्यांच्या आर्थिकबाबी ऐवजी आजारापासून बरे कसे व्हावे यावर लक्ष केंद्रित करू द्यायचे आहे. ”

प्रीमियम दर केवळ रू. 5,329, कोव्हीड शिल्ड + कोव्हीड -19 निदानानंतर आयसीयू / एचडीयूमध्ये किमान 24-तास दाखल झाल्यानंतर गंभीर आजाराचा लाभ किमान रू.10 लाख. याव्यतिरिक्त, 19 निदानानंतर रु 25 लाख चे मुदत विमा लाभ. सद्य परिस्थितीत द्रुत जारी करण्याचे महत्त्व ओळखून, उत्पादनास कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नसते आणि पॉलिसी अर्जदारास त्वरित निर्णय दिले जाते.

“या उत्पादनाच्या रचनेत योगदान देणारे अनेक घटक होते. आयसीयू / एचडीयू मध्ये भर्ती होणे हे एक खर्चीक बाब असू शकते, शिवाय दवाखान्यातून सुटी मिळाल्यानंतरचे खर्च देखील महत्त्वपूर्ण असतात. जर कुटुंबाचा कमावता व्यक्ति या रोगाने जगला नाही तर उत्पन्नाचे नुकसान होण्याचे देखील बरेच प्रमाण आहे. काही कुटुंबे आधीच नोकरी गमावण्याच्या चिंतेचा सामना करत आहेत आणि कोणताही मोठा आरोग्य खर्च त्यांच्या बचतीची रक्कम पूर्णपणे संपवून टाकू शकेल. कोव्हीड शिल्ड + हा एक व्यापक उपाय आहे जो अशा प्रकारच्या घटनांपासून आर्थिक संरक्षण प्रदान करतो, ”मुखोपाध्याय पुढे म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close