Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने पुरस्कार सुरु करा ; मराठा सेवा संघाची मागणी


मानवत /अनिल चव्हाण

संगीत सूर्य केशवराव भोसले हे आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार होते त्यांनी ३२ वर्षा पैकी २८ वर्ष मराठी रंग भूमीवर तळपत राहिले त्यामुळे संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने नाटक व व संगीत क्षेत्रातील कर्तुत्ववान कलावंतासाठी पुरस्कार सुरू करण्यात यावे अशी मागणी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष माधव नाणेकर यांनी तहसीलदार डी. डी. फुपाटे यांना गुरुवार ४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनात केली आहे.

संगीत सूर्य केशवराव भोसले यांनी अभिनेते गायक नाट्य दिग्दर्शक नाट्य निर्माता व्यवस्थापक कुशल संघटक अशा अनेक व्यक्तिमत्त्वाचे ते धनी होते ३१ वर्षात त्यांनी ३१ अशा अजरामर भूमिका केल्या परंतु अशा थोर कलावंतांची आजतागायत उपेक्षा झाली आहे. त्यांच्याजवळ कर्तुत्वाला शासनाने आणि समाजाने समजून घेतले नाही ही मोठी खंत आहे. संगीत सूर्य केशवराव भोसले यांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे त्या निमित्ताने शासनाला व समाजाला या संगीत सूर्यासाठी खूप काही करता येऊ शकतो समाज म्हणून आमच्या संगीत सूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेने वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे केवळ लोक आश्रयाने हे काम पूर्ण होणार नाही त्यासाठी राजश्रेयाची गरज आहे त्यामुळे संगीत सूर्याच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संगीत नाटक क्षेत्रातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू करा, शासकीय पातळीवर संगीत सूर्य केशवराव भोसले यांची जयंती पुण्य तिथी निमित्त कार्यक्रम आयोजित करा, स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या नावे स्मृती शताब्दी विशेषांक प्रकाशित करण्यात यावा, संगीत सूर्य केशवराव भोसले कला साहित्य व संस्कृती केंद्र स्थापन करा अशी मागणी मानवत तालूका मराठा सेवा संघाच्या वतीने तहसीलदार डी.डी. फुपाटे यांना दिलेल्या निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष माधव नानेकर, कार्याध्यक्ष बाळासाहेब काळे, सचिव अँड. सुनील जाधव, संभाजी ब्रिगेडचे मानवत तालुका अध्यक्ष गोविंद घांडगे, राजेभाऊ होगे, आमेर अन्सारी, ज्ञानेश्वर चांगभले, रामप्रसाद काळे, गजानन होगे, कृष्णा शिंदे, कैलास दळवे, मोहन महीपाल, महादेव शिंदे, गोपाळ पिंपळे, बालाजी टाक, यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close