Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

सिडकोच्या आदेशाला झुगारून कामगारांच्या पाठीशी राहणाऱ्या स्व.दि.बा.पाटील पनवेल उरण स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचा सत्कार

समिती अध्यक्ष बबनदादा पाटील, सचिव सुदाम पाटील उपस्थित


पनवेल : राज भंडारी 
सिडकोमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या कामगारांना सिडकोने कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. सदर बाब पनवेल उरण महाविकास आघाडीच्या स्व.दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या समोर आली असता समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सिडकोच्या या आदेशाला झुगारून येथील सुरक्षा रक्षकांच्या जाणाऱ्या नोकऱ्या वाचविल्या, त्यामुळे आपलोय रोजगार वाचविणाऱ्या समितीचा या सुरक्षा रक्षकांमार्फत शुक्रवारी सत्कार करण्यात आला. 
यावेळी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या स्व.दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, सचिव सुदाम पाटील, अभिजित पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सुरक्षा रक्षकांनी समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांचे विशेष आभार मानले. यावेळी बबनदादा पाटील यांनी बोलताना सांगितले की, पनवेल उरण परिसरातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि कामगार वर्गातील मंडळी आमची ताकद आहे, त्यांना जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्याविरोधात प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती पेटून उठेल. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन सिडको प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यामुळे सिडको असू दे अथवा महापालिका असू दे, कोणाचीही गय केली जाणार नाही. 
पनवेल उरण येथील कामगारांवरील या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या स्व.दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या परिसरातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कामगार वर्गांवर अन्याय होऊ नये, म्हणून स्व.दि,बा.पाटील साहेबांनी आपली हयात घालविली आहे. आणि त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही समितीची सर्व मंडळी काम करीत असतो. त्यामुळे आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवावर कोणी उठला तर मात्र कोणाचीही गय केली जाणार नसल्याचेही यावेळी बबनदादा पाटील यांनी सांगितले. 


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close