Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

नैसर्गिक आपत्तीत कोकण विभागाची सज्जता

महाराष्ट्रातील इतर महसूल विभागांच्या तुलनेत कोकण महसूल विभाग अनेक अर्थाने खूप वेगळा आहे. एकाच वेळी सागरी, डोंगरी, औद्योगिक आणि अधिक लोकसंख्येची घनता असणारा प्रदेश, म्हणून कोकणाचा समावेश होतो. मुंबई शहर आणि उपनगर हे देखील कोकण विभागात येतात. मुख्यत: कोकणात जून ते सप्टेंबरपर्यंत मोठ्याप्रमाणावर पाऊस असतो. आणि याच काळात अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. त्यासाठी प्रशासनाला खूप अगोदरपासून तयारी करावी लागते. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी परवा आढावा बैठक घेवून कोकण विभगाची तयारी कशी आहे. याबद्दल माहिती जाणून घेतली. आणि आवश्यक त्या उपाययोजना देखील सूचविल्या.

येणाऱ्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने व काळजीपूर्वक काम करावे. तसेच नागरिकांना वेळीच सूचना मिळतील याची काळजी घ्यावी. हवामान विभागाकडून पाऊस, वादळ व इतर आपत्तीविषयी प्रशासनाला अद्ययावत माहिती सातत्याने मिळाली पाहिजे. त्यामुळे यंत्रणांना सावध राहून बचाव कार्य करता येईल. या काळात समुद्रात दूरवर जाऊन मासेमारी करणाऱ्या बोटींशी संपर्क असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पूर्वतयारी केली आहे. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्यांचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यन्वीत आहेत.

गतवर्षी तिवरे धरणाची दुर्घटना घडली. यंदा तसे होवू नये यासाठी कोकणातील धरणांची देखभाल व दूरुस्ती व्यवस्थित झाल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करणे आवश्यक आहे. धरणाजवळ असणाऱ्या गावातील लोकांना सावध करावे. नैसर्गिक आपत्तीच्यावेळी त्यांना सुरक्षित जागी हालवण्यासाठी पर्यायी व्यवस्था आतापासूनच करून ठेवावी. पालघरमध्ये लहान लहान भूकंप झाले होते. याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. 2020 मध्ये कोकण विभागात 3 हजार 173 मिमि पाऊस झाला होता. विभागात 371 पूर प्रवण आणि 223 दरडग्रस्त गावे आहेत. विभागात जीवरक्षक बोटी, जॅकेट व इतर सामुग्री उपलब्ध आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तुकडी चिपळूण येथे तैनात असणार आहे. यासाठी मॉकड्रील झाले आहे. कोकण विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई याठिकाणी लवकरच नवीन रडार उभारण्यात येत आहेत. त्यामुळे हवामानाचा अंदाज अधिक परिपूर्ण आणि अचूक होऊ शकेल. पूर्वी आपल्याकडे चक्रीवादळाचा धोका नसायचा. पण 2017 पासून ओखी, वायू, क्यार, निसर्ग यासारख्या चक्रीवादळांनी किनारपट्टीतील भागाचे खूप नूकसान केले आहे. वीज पडण्याचा धोका हा प्रत्यक्ष पावसाळ्यापेक्षा अगोदरच्या काळात म्हणजे एप्रिल, मे मध्ये जास्त असतो. नवीन तंत्रज्ञान विकसित झाल्याने हवामानाचा अचूक अंदाज करणे आता शक्य आहे.

कोकण विभागीय महसूल आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी मुंबई शहर, उपनगर, ठाणे,रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यांचा खरीप पूर्व कामांचा आढावा सादर केला. मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रात यासाठी मुंबई महापालिका विशेष काळजी घेते. भरतीचे पाणी तुंबू नये यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे या पावसाळ्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा येतील. भरतीचे 18 दिवस आहेत. मुंबत जर यादिवशी जास्त पाऊस पडला, तर समुद्रातील भरतीमुळे उधाण पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाऊ शकत नाही. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी तुंबण्याची जास्त शक्यता असते. भरतीचे दिवस सर्वसाधारणपणे पुढील प्रमाणे असतील.

बुधवार 23 जून सकाळी 10.53 भरतीची उंची 4.57 मीटर, गुरुवार 24 जून सकाळी 11.45 भरतीची उंची 4.77 मीटर, शुक्रवार 25जून दुपारी 12.33 भरतीची उंची 4.85 मीटर, शनिवार 26 जून दुपारी 1.23 भरतीची उंची 4.85 मीटर, रविवार 27 जून दुपारी 2.10 भरतीची उंची 4.76 मीटर, सोमवार 28 जून दुपारी 2.57 भरतीची उंची 4.61 मीटर, शुक्रवार 23 जुलै सकाळी 11.37 भरतीची उंची 4.59 मीटर, शनिवार 24 जुलै दुपारी 12.24 भरतीची उंची 4.71 मीटर, रविवार 25 जुलै दुपारी 01.07 भरतीची उंची 4.73 मीटर अशी राहील.

कोकण विभागातील आपत्ती काळात चोवीसतास कार्यरत असणारे विभागीय आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष पुढील प्रमाणे आहेत. कोंकण भवन, नवी मुंबई – 022-27571516, मुंबई शहर- 022-22664232, मुंबई उपनगर- 022-26556799/26556806, ठाणे-022-25301740/25381886,पालघर -0252597474, रायगड-02141-222118-222097, रत्नागिरी-02352-226248, सिंधुदुर्ग-02362-228847 /228608.

पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे जनतेने तातडीने पूर्ण करुन घ्यावीत. तसेच या काळात शासन आपल्यासाठी तसेच याकाळात शासन आपल्यासाठी सज्ज असल्याचेही मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकारे यांनी बैठकीत स्पष्ट् केले. एकूणच येणाऱ्या काळात कोकण विभागातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

प्रवीण रा.डोंगरदिवे माहिती सहाय्यक विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close