Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, पुन्हा माझं नाव घ्याल तर याद राखा ; दमानियांनी दिला इशारा

खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, पुन्हा माझं नाव घ्याल तर याद राखा ; दमानियांनी दिला सज्जड इशारा

मुंबई – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आपण पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं खडसे यांनी काल मुक्ताईनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीकाही केली आहे.

मात्र काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खडसेंनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचेही नाव घेतलं. ‘अंजली दमानिया यांनी माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला. त्यावेळी पोलिस गुन्हा दाखल करण्यासाठी तयार नव्हते. पण फडणवीस यांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला’, असा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खडसेंवर हल्लाबोल केला आहे. ‘माझा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात होता. कोणत्याही एका व्यक्तिविरोधात नव्हता. मी नितीन गडकरी आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणी केला नसेल, असं सांगतानाच यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा अंजली दमानिया यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेतून दिला आहे.

तर, याचप्रकरणी अंजली दमानिया यांनी काल एक ट्विट करून आपला रोष व्यक्त केला होता. “एकनाथ खडसेंच्या कालच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्षात ऐकले नव्हते. पण रात्री मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली”. असा घणाघात त्यांनी केला होता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close