Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

खडसेंनी मला व्हिलन ठरवलं, त्यांच्यावर मी योग्य वेळी बोलेन: देवेंद्र फडणवीस

औरंगाबाद : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ खडसे यांनी केलेल्या या टीकेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
नाथाभाऊंनी राजीनामा दिला हे अत्यंत दुर्देवी आहे. त्यांनी राजीनामा दिला नसता तर अधिक चांगलं झालं असतं. त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही अडचणी होत्या तर त्यांनी वरिष्ठांना तक्रार करायला हवी होती. आता ते ज्या गोष्टी सांगत आहेत… मी एवढेच म्हणेन ते अर्धसत्य आहे, पण मी आज त्यावर बोलणार नाही. मला कुठलीही प्रतिक्रिया त्यावर द्यायची नाहीये. योग्य वेळ येईल तेव्हा मी त्यावर सविस्तर प्रतिक्रिया देईल

https://www.facebook.com/239595939526679/videos/1436011016588490/

त्यांनी मला व्हिलन ठरवलं
फडणवीसांनी माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते अर्धसत्य सांगत आहेत, ती केस काय आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तीन दिवस माध्यमांनी चालवलं. त्यानंतर ती केस कशी झाली हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. मला त्यावर बोलायचं नाहीये, अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं त्यांनी मला ठरवलं आहे. काही हरकत नाहीये मी त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाहीये.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close