Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणलाईफ स्टाईल

अश्या पद्धतीने ठेवा पावसाळ्यात आहार, कुठलेही पदार्थ खाऊ नये…


 • धान्ये व कडधान्ये
  पावसाळ्यात धान्याच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचनास हलक्या असतात. त्यामुळेच पावसाळ्यात येणाऱ्या नागपंचमीच्या सणाला लाह्या खाल्या जातात. पचनास हलकी असणारी मूग डाळ पावसाळ्यामध्ये आहारात घ्यावी. मूग डाळीचे वरण हे भातामध्ये तूप घालून खावे.
 • पालेभाज्या
  या दिवसात रानभाज्या ह्या सर्रास सगळीकडे उपलब्ध असतात,रानभाज्यांचे सेवन आरोग्यास फायदेशीर ठरते. स्वच्छ करुनच भाज्यांचा आहारात उपयोग करावा. भेंडी, कारले, पडवळ, दुधी भोपळा या फळभाज्यांचा आहारात समावेश करावा. विविध भाज्यांचे गरम सूप प्यावेत.
 • पावसाळ्यातील फळे पावसाळ्यात फळे स्वच्छ करुनच खावीत.
 • जास्त पिकलेली फळे खाऊ नयेत. पावसाळ्यात आंबा, फणस, केळी खाणे टाळावे. कारण यांमुळे अपचन होऊन जुलाब, अतिसार होण्याची अधिक शक्यता असते. मांसाहार
  मांसाहारी पदार्थ हे पचनास जड असतात. पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ म्हणजे मटण, मासे खाणे शक्यतो टाळावेत. याशिवाय पावसाळा हा मासे आणि इतर जलचरांचा प्रजननाचा काळ असतो . त्यामुळेचं श्रावण महिन्यात मांसाहार वर्म्य केला जातो. पावसाळ्यात काय खाऊ नये?
  पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.
  • पावसाळ्यात प्रमाणापेक्षा जास्त आहार घेणे टाळावे. थंडगार पदार्थ, दही, लोणची, ब्रेड, जास्त खारट पदार्थ, फास्टफूड खाणे टाळावे. बाहेरचे उघड्यावरील भेळ, पाणीपुरी यासारखे पदार्थ, माशा बसलेले दूषित अन्न, शिळे पदार्थ, अर्धवट शिजलेले अन्न पावसाळ्यात खाणे टाळावे.
  मांसाहारी पदार्थ पचनास जड असल्याने पावसाळ्यात नॉनव्हेज पदार्थ खाणे टाळावे.
  • तळलेले पदार्थ पचण्यास जड व पित्त वाढवत असल्याने तळलेले पदार्थ जास्त खाणे टाळावे.

Health Coach,
Nilesh Pardeshi
whats app: 9822633270

अशीच आरोग्य संदर्भात माहिती साठी लिंक वरून ग्रुप जॉईन करा व तुम्ही हा मॅसेज तुमच्या मित्रांना व इतर व्हॉट्स ॲप ग्रुप वर पाठवू शकता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close