Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

करमाड – बिडकीन ते दहेगाव बंगला रस्ता कामात सुधारणा करा नसता रास्तारोको आंदोलन

स्वाभिमानी छावाचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे यांचा सा.बां.विभागाला आंदोलनाचा इशारा…!

पैठण –करमाड – बिडकीन ते दहेगाव बंगला नगर हायवे पर्यंत रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन चालु असुन रस्ता कामात अनियमितता दिसुन येत असुन कामात सुधारना करा अन्याथा आंदोलन करू आसा इशारा स्वाभिमानी छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज पाटील मुरदारे यांनी सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे औरंगाबाद मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांना निवेदनाव्दारे दिला आहे.
सदरिल काम हे अत्यंत संथ गतीने चालु असल्याने अपघाताच्या प्रमाणात विनाकारण वाढ झाली आहे.बिडकीन येथिल नागरिकांना सुद्धा रहदारी करण्यासाठी अचणीचा सामना करावा लागत आहे.या कामात रस्त्याची कटींग व्यवस्थित करण्यात आलेली नाही.तसेच साईड पंखे व्यवस्थित भरण्यात आलेले नाही.कामावर अंदाजपञकाचा बोर्ड,दिशा दर्शक फलक,सुचना फलक लावण्यात आलेला नाही.निलजगाव फाटा ते बिडकीन बाजारतळ रोडवर नागरीक वास्तव्यास असलेल्या ठिकाणी सा.बा. विभागाच्या वतिने सिमेंटचे गटार नालीचे बांधकाम करण्यात आले आसुन ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाल्यानेत्याला गळती लागलेली आहे.काम करण्यापुर्वी रस्त्याची कटींग न केल्यामुळे नागरिकांची घरे खाली व रस्ते उंच झाले आहेत.सदरील कामावर निकृष्ट साहित्य वापरल्यामुळेच व जबाबदार अभियंता या कामावर उपलब्ध नसल्याने सदरील काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.त्यामुळे शासनाचा करोडो रूपयांचा निधी वाया गेला आहे.या कामाचे कंञाट कल्याण टोल या कंपणीला देण्यात आला असुन कंपनीने सा.बां.विभागाची लाखो रूपयाची फसवणूक केली आहे.सदरील कल्याण टोल या कंपनीने केलेल्या कामाची चौकशी दक्षता व गुण नियंञण मंडळा मार्फत करण्यात यावी व अंदाजपञकानुसार काम करण्यात येऊन दोषी कञाटदार व अभियंता यांच्यावर कठोर कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत येत्या आठ दिवसात योग्य ति कारवाई करून न्याय देण्यात यावा नसता स्वाभिमानी छावा मराठा संघटनेच्या वतिने पैठण – औरंगाबाद मुख्य रस्त्यावरिल निलगाव फाटा येथे भव्य रास्ता रोको आंदोलन करून निदर्शने आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज मुरदारे यांनी दिला आहे.

अन्यथा सा.बा.विरोधात रास्तारोको आंदोलन…

या रस्त्याचे काम अंदाजपञकानुसार झाले नसुन ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.अभियंता यांंच्या दुर्लक्षामुळे काम संथ गतिने चालु असुन कामावर फलक नसल्यामुळे राञीचे आपघाताचे प्रमाण वाढले आहे.आम्ही सा.बां.प्रा.विभागाचे औरंगाबाद मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन कामात सुधारना करण्याची मागणी केली आहे.नसता स्वाभिमानी छावा संघटनेच्या वतिने नागरिकांना सोबत घेऊन पैठण – औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.

       मनोज पाटील मुरदारे

जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी छावा संघटना-जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी छावा संघटना

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close