Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

कन्नड :भरधाव ट्रकची मोटारसायकला धडक-दोन गंभीर



कन्नड : सुरतहून हैदराबाद कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकला धडक दिल्याने मोटारसायकल वरील दोन जण गंभीर जखमी झाल्यांची घटना कन्नड जवळील धुळे सोलापूर बायपास जवळील साई सेवा हाटेल जवळ घडली .याबाबत अधिक माहिती अशी की सुरतहून हैदराबाद कडे कापसाच्या गाठी घेऊन ट्रक क्रमांक भरधाव वेगाने जात असताना औरंगाबाद हून कन्शड कडे मोटारसायकलने येणाऱ्या दत्तु रामेश्वर वायडे वय २२ ,व भुषण संजय मोतीवाले वय २० रा भिल्लपटण गल्ली कन्नड यांना जोरांची धडक दिल्याने गंभीर जखमी झाले तर अपघात ग्रस्त ट्रक हा हायवेच्या सिंमिटी ओट्यावर चढून गेला व पलटी झाला .हा अपघात दिनांक २३ जानेवारी रोजी दुपारी कन्नड पासून जवळच असलेल्या धुळे सोलापूर हायवेच्या बायपास जवळील साई सेवा हाँटेल जवळ घडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीसांचे पथक घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली.जखमीना भरत त्रिभुवन व राजू वायडे यांनी तातडीने पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी कन्नड शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close