Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

“पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवंदना

पापनाशिनी गंगाच्या शीर्षकगीताद्वारे कैलाश खेर यांनी देवी गंगाला वाहिली मानवदना

     पवित्र संगीतात एक अनोखी गुणवत्ता असते; ते आपल्या प्रेमाने आणि विलक्षण अशा शांततेने आत्म्याला भारून टाकते आणि नेमक्या याच हेतूने इशाराने “पापनाशिनी गंगा”च्या शीर्षकगीताची रचना करायचे योजले. देवी गंगा मातेच्या देवत्व आणि सद्गुणांची कथा सांगणाऱ्या या गीतात, तिच्या प्रती असणारे प्रेम आणि आदर दिसून येतो. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, कैलाश खेर यांचा काळजाचा ठाव घेणारा सुरेल आवाज या शीर्षकगीताला साजेसाच आहे आणि त्यामुळे ते खूपच परिणामकारक झाले आहे.

आपल्या सुंदर शब्दरचनेतून हे गीत देवी गंगेच्या जन्माच्या सुरस कथेवर भाष्य करते आणि तिच्याबद्दलच्या अनेक भावना व भक्ती दर्शवते. देवी गंगेची, भगवान विष्णूंच्या नखापासून कशी उत्पत्ति झाली? आणि महादेव शिव यांनी तिला मानवतेच्या उद्धारासाठी पृथ्वीवर अवतरण्यास कशी मदत केली? याबद्दलची सुंदर कथा हे गीत सांगते.

कैलाश खेर म्हणाले, “पापनाशिनी गंगाच्या शीर्षकगीताने देवी गंगा मातेची कहाणी अतिशय सुरेखपणे शब्दांकित केली आहे. मला इशाराच्या पापनाशिनी गंगाचा एक हिस्सा होण्याची संधी जेव्हा मिळाली ती  माझ्यासाठी खूप आनंदाची बाब होती. पापनाशिनी गंगाने मला अध्यात्माच्या छटा दाखवण्याचे स्वातंत्र्य दिले, ज्यामुळे त्या रचनेला सखोल गाभा लाभला.”

ते पुढे म्हणाले“माझे संगीत हे माझ्या विचारांचे आणि मी आयुष्य कसे जगतो याचे प्रतिबिंब आहे. मी माझ्यातला एक हिस्सा या गाण्याला अर्पण करण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा कैलाश हा गंगा आणि हिमालयाचीच वृद्धी आहे.”  

१ मार्च २०२१ ला प्रारंभ होणारी, इशारा एक २४ x ७ हिंदी करमणूक देणारी वाहिनी असेल, जी भारतातील प्रक्षेपणासाठी सर्व प्रमुख डिपीओज् (डिटीएच आणि केबल नेटवर्क) वर प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. इशाराने यापूर्वीच त्यांच्या ‘जनानी, ‘हमकदम’ आणि ‘अग्नी वायु’ या तीन मालिकांच्या घोषणेनंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे आणि आता पापनाशिनी गंगा सोबत ते नक्कीच प्रेक्षकांच्या मनांवर राज्य करतील अशी आशा आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close