Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

के. ओ. गिऱ्हे यांचे आकस्मिक निधनभटक्या विमुक्त चळवळीचे भावविश्व हरपले

औरंगाबाद –    भटक्या विमुक्त आणि आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक के. ओ. गिऱ्हे (वय- ६५) यांचे शनिवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.त्यांच्यावर गोलवाडी या मूळगावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी लेखिका जनाबाई गिऱ्हे, तीन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मागील ४० वर्षांपासून भटक्या-विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के. ओ. गिऱ्हे यांचे शनिवारी निधन झाले.करोना संकटात भटक्या-विमुक्तांच्या पालावर जाऊन त्यांना जीवनावश्यक साहित्याची मदत करणारे गिऱ्हे यांच्या अचानक जाण्याने सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला.कृषी विभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर गिऱ्हे यांच्या सामाजिक आणि साहित्य कार्याला गती मिळाली होती.भटक्यांचे भावविश्व या मासिकातून त्यांनी वंचितांच्या वेदनांना वाचा फोडली.या मासिकाद्वारे भटक्यांचे साहित्य संमेलन घेण्यास त्यांनी दोन वर्षांपूर्वी सुरुवात केली होती.भटक्या विमुक्तांच्या वेदना त्यांनी ग्रंथातून मांडल्या होत्या.त्यांचे भटके हे आत्मकथन गाजले होते.”गोपाल समाज इतिहास व संस्कृती”,”दोरीवरचं काळीज”,”भटक्यांची स्वातंत्र्याची पहाट कधी उजाडेल”,”मजल दरमजल” ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत.”भटक्यांचे भावविश्व” या मासिकाचे संपादक म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते.गोपाळ समाजातील पारंपरिक अनिष्ठ प्रथांना विरोध करीत गिऱ्हे यांनी पत्नी जनाबाई गिऱ्हे यांना शिकवले होते.त्यामुळे त्या गोपाळ समाजातील पहिल्या शिक्षिका ठरल्या.जनाबाई यांचे “मरणकळा” हे आत्मकथन प्रचंड गाजले आहे.आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून त्यांनी भटक्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला होता.गिऱ्हे यांनी अखिल भारतीय भटके आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.सध्या महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त संघर्ष समितीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.जेष्ठ साहित्यीक टी. एस. चव्हाण, कवी एकनाथ खिल्लारे, सामाजिक कार्यकर्ते दुर्गादास गुढे, अंबादास रगडे, पंडित तुपे, प्राचार्य हसन इमानदार, प्रा. ग. ह.राठोड, कवी किसन पवार, प्रा. शिवाजी वाठोरे, भारत ससाणे, प्रा.सुधीर आणवले, कोंडीबा हटकर , कवी ना. तू. पोगे, भीमराव मोटे, प्रा. प्रकाश वाघमारे, सर्जेराव मुसळे, प्रा.नवनाथ गोरे यांनी गिऱ्हे यांना श्रद्धांजली वाहिली. 

के. ओ. गिऱ्हे म्हणजे सतत धडपडणारे मितभाषीय व्यक्तिमत्त्व होते.भटक्यांचेे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नेहमी आवाज उठवला.त्यांच्या जाण्याने भटक्यांचे साहित्यविश्व लुळेपांगळे झाले.आंबेडकरी साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे,असे कवी आणि सामाजिक कार्यकर्ते टी. एस. चव्हाण म्हणाले.

के. ओ.गिऱ्ह ऋजू मनाचे आणि अत्यंत विनयशील होते. भटका विमुक्त समाज मंद गतीने बदलाची कास धरतोय याचे शल्य त्यांच्या मनात असायचे.बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाची वाट धरल्याशिवाय भटका विमुक्त समाज उन्नती करुच शकणार नाही, यावर त्यांचा नितांत विश्वास होता. भटक्या समाजाचं दुःख जगासमोर मांडण्यासाठी त्यांनी भटक्यांचं भावविश्व हे नियतकालिक सुरु केलं होतं.अत्यंत पोटतिडकीनं ते भटक्या समाजाचं दुखणं मांडत असत.त्यांचं अचानक जाणं चटका लावणारं आहे, असे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी म्हटले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close