Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

जोशी, भारसाखळे, सलामपुरे यांची महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेवर निवड


पुणे येथे कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी ऑलंम्पियन आदिल सुमारीवाला

औरंगाबाद -जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष माजी आ.श्रीकांत जोशी यांची महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या उपाध्यक्षपदी, पंकज भारसाखळे यांची सहसचिवपदी तर फुलचंद सलामपुरे यांची राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी ऑलिंपियन आणि अर्जुन अवॉडी आदिल सुमारीवाला यांची फेरनिवड झाली तर आंतरराष्ट्रीय पंच सतीश उचील यांची सचिवपदी निवड झाली.

श्रकांत जोशी यांच्या रूपाने मराठवाड्याला प्रतिनिधित्व देण्यात आले असून पुढील काळात आपण अॅथलेटिक्सचे ऑलिम्पिक खेळाडू घडविण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले आंतराष्ट्रीय दर्जाचे सिन्टेटिक ट्रॅक उभारण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे श्रीकांत जोशी यांनी ह्यावेळी सांगितले.
पुणे येथील मॅरेथॉन भवन येथे झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेची २०२०-२४ वर्षासाठीची संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवडून आली. निवडणुकीला भारतीय अॅथलेटिक्स महासंघातर्फे कोषाध्यक्ष मधुकांत पाठक तर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे निरीक्षक म्हणून उपस्तित होते

(२०२०-२४): अध्यक्ष: आदिल सुमारीवाला, सभापती: अभय छाजेड, उपाध्यक्ष: श्रीकांत जोशी, नारायण खडके, बाळाराम पाटील, गोपालसिंग राजपूत, संजय बडोले, ललित जीवानी, संजय पाटील, राजू प्याटी, सचिव: सतीश उचील, कोषाध्यक्ष: माधव शेजूळ सहसचिव: पंकज भारसाखळे, शरद सूर्यवंशी, दिनेश भालेराव, सुरेश फराकटे, प्रलोभ कुलकर्णी, अतुल पाटील, हेमंत पांडे, अशोक आहेर सदस्य: फुलचंद सलामपुरे, राकेश सावे, राजीव जोशी, रणजितसिंग राणे, राजीव कुलकर्णी, राजेश जाधव, रमेश गंगावणे, सुरेश अडपेवार.

ह्या कार्यकारिणीला औरंगाबाद जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे डॉ.रंजन बडवने, प्राचार्या शशी निळवंत, जालन्याचे सचिव प्रा.बाबू यादव, मोहन मिसाळ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close