Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

शिव जन्मोत्सवा निमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम

मानवत : अनिल चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने मानवत शहरात जिजाऊ बिग्रेडच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर, रांगोळी स्पर्धा, व्याख्यान या सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या मानवत तालुका अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई साखरे यांनी दिली.

हेही वाचा विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना

हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

हेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक


सविस्तर वृत्त असे की,
दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक , शककर्ते, कूळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिव जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून त्या संदर्भात जिजाऊ बिग्रेडची महत्वाची बैठक मानवत शहरातील जिजाऊ नगर मध्ये अशोकराव शिंदे यांच्या निवासस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई साखरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकी मध्ये सुरुवातीला महिलांच्या हस्ते जिजाऊ पूजन करूण पूष्पहार अर्पण करण्यात आले.


या वेळी हिंदवी स्वराज्य संस्थापक , कूळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानवत तालूका जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्या च्या संदर्भात महत्व पूर्ण चर्चा करण्यात आली.
या महत्व पूर्ण बैठकी मध्ये मानवत शहरासह ग्रामीण भागातील महिलां साठी आरोग्य तपासणी शिबिर, दोन गटात रांगोळी स्पर्धा , व व्याख्यानाचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले.
या शिवाय १९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मानवत शहरातून काढण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मिरवणुकीमध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या वेळी करवण्यात आले. या वेळी जिजाऊ बिग्रेडच्या सौ. शारदा गजमल, सौ. मनीषा भिसे, डॉ. सौ. प्रणिता कदम, सौ. शैलेजा बारहाते, सौ. राधिका बारहाते, सौ. पद्मजा बारहाते, सौ.वैशाली शिंदे,सौ. मीराताई शेळके, डॉ. सौ. अनिताताई इक्कर, डॉ. सौ. सुमतीताई भिसे, सौ. शोभाताई आंबेकर, सौ. कोमलताई काकडे, सौ. मुक्ताताई बारहाते, सौ. सुनिताताई नानेकर, सौ. मिराताई शिंदे, सौ. सुनिताताई काळे, सौ. सत्यशीलाताई मुळे, सौ. अरुणाताई बारहाते, सौ. छायाताई झुंजूर्के, सौ. कीर्तीताई भिसे, सौ. सीमाताई जाधव, यांच्या सह जिजाऊ ब्रिगेडच्या अनेक महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close