Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मुलांमध्ये जय बजरंग क्रीडा मंडळ संघ प्रथम विजेता

मुलींमध्ये शिवगर्जना क्रीड़ा मंडळ संघाने मारली बाजी


संभाजीनगर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शिवसेना संभाजीनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या वतीने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते दोन दिवसापासून या स्पर्धा चालू होत्या प्रत्येक संघ जिंकून येण्यासाठी आपली बाजी पणाला लावत होते शेवटी अत्यंत चुरशीच्या आणि रंगतदार झालेल्या मुलांच्या सामन्यात जय बजरंग क्रीडा मंडळ डोणगाव तांडा संघाने प्रथम विजेतेपद पटकावले व मुलींमध्ये शिवगर्जना क्रीडा मंडळ रांजणगाव या संघाने प्रथम विजेतेपद पटकावले शिवसेना नेते दिवाकर रावते मंत्री संदिपान भुमरे साहेब आमदार संजय शिरसाठ आयोजक आमदार अंबादास दानवे शिव छत्रपति पुरस्कार प्राप्त अंतर राष्ट्रिय कबड्डी खेळाडू सायली किरमाले क्रीड़ा अधिकारी कविता नावंदे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन या दोन्ही संघांना गौरविण्यात आले.
यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते म्हणाले की सामाजिक कार्य करत असताना अश्या मातीतल्या मैदानी स्पर्धा आयोजित करून खेळांना खेळाडूंना प्रोत्साहन मिळत असते राज्य व देश पातळीवर नाव उज्वल करणारे खेळाडू तयार होतात यांच्यामुळेच जिल्ह्याचे व राज्याचे नाव मोठे होते अयोजकनी अश्या स्पर्धा आयोजित केल्या बद्दल त्यांचे कौतुक ही केले.
यावेळी आमदार संजय शिरसाट म्हणाले खेळ असो किंवा कोणतेही कार्य जिद्द आणि मेहनत केली तर विजय नक्कीच मिळतो अशा स्पर्धा आयोजित केल्यामुळे खेळही जिवंत राहतो आणि खेळाडूंनाही आपल्या कला गुण दाखवण्यास वाव मिळतो.
यावेळी छत्रपती पुरस्कार प्राप्त अंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू सायली किरमाले म्हणाल्या की अशा क्रीडा स्पर्धा घेतल्यामुळे खेळाडूंना आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी संधी मिळते खेळाडूंनी अथक परिश्रम आणि मेहनत केली तर यश नक्कीच मिळते
आज दुसऱ्या दिवशी झालेल्या रंगतदार कबड्डी सामन्यांमध्ये मुलांमध्ये १)जय बजरंग क्रीडा मंडळ डोणगाव तांडा यांनी प्रथम तर २)परमवीर क्रीडा मंडळ रामनगर यांनी द्वितीय तर ३)मद्वनाथ क्रीडा मंडळ शेंदुरवादा यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले त्याचप्रमाणे मुलींमध्ये १) शिवगर्जना क्रीडा मंडळ रांजणगाव प्रथम तर २) भारत माता क्रीडा मंडळ संभाजीनगर यांनी द्वितीय आणि ३) न्यू हायस्कूल गदाना यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
त्याचप्रमाणे मुलांमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षय सूर्यवंशी, उत्कृष्ट पकड म्हणून अमोल राठोड ,उत्कृष्ट चढाई भारत भवर व प्रवीण जाधव यांना विभागून बक्षीस देण्यात आले, त्याचप्रमाणे शिस्तबद्ध संघ म्हणून भारत माता क्रीडा मंडळ व उत्कृष्ट गणवेश म्हणून हनुमान क्रीडा मंडळ यांना गौरविण्यात आले
तसेच मुलींमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून शिवांजली सावंत, उत्कृष्ट चढाई पूजा देसाई ,उत्कृष्ट पकड पूजा जमदाडे ,उत्कृष्ट गणवेश राजमुद्रा क्रीड़ा मंडळ संघ, शिस्तबद्ध संघ म्हणून न्यू हायस्कूल गदाना यांना बक्षीस देण्यात आले या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कबड्डी असोसिएशन चे सर्व पदाअधिकारी अध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर उपाध्यक्ष प्राध्यापक ज्ञानदेव मुळे सर व त्यांच्या पंच प्रमुख व सहाय्यक पंच यांनी अतिशय परिश्रम घेतले
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी कबड्डी प्रेमी नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनिल पोलकर बाळासाहेब थोरात विजय वाघचौरे राजू वैद्य गणपत खरात संदेश कवडे संजय हरने अनिल जैस्वाल सुरेश कार्डिले मोहन मेघावाले हिरा सलामपुरे बन्सी मामा जाधव तुकाराम सराफ सुनीता देव प्रतिभा जगताप अनीता मंत्री प्राजक्ता राजपूत आदीची उपस्थीती होती

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close