Subscribe to our Newsletter
मराठवाडा

जालना-तीन सख्ख्या भावांचा विहिरीत शॉक लागून मृत्यू

जालना / सुरेश गिराम

जालन्यातील भोकरदन तालुक्यातील पाळसखेड पिंपळे  पळसखेडा पिंपळे या गावातील ३ सख्ख्या भावंडांचा विहिरीत पडून मृत्यू झालाय.आज भल्या पहाटे ही दुर्घटना घडली.या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केल्या जातीय.विजेचा शॉक लागून या तिन्हीही सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतीय.

ज्ञानेश्वर जाधव वय 28 वर्ष,रामेश्वर जाधव वय 25 वर्ष आणि सुनील जाधव वय 18 वर्ष जालन्यातील पिंपळगाव पिंपळे गावातील या तिन्हीही सख्ख्या भावंडांचा आज भल्या पहाटे विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.या घटनेमुळे जाधव कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळलाय. जाधव भांवंडांच्या अशा अकाली मृत्युमुळे त्यांचे आई,वडील आणि आजीच्या डोळ्यातील पाण्याच्या धारा थांबता थांबत नाहीय.आज भल्या पहाटे हे तिन्हीही भाऊ रात्र पाळीची वीज असल्यानं शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते.पण आज भल्या पहाटे तिघांचेही मृतदेह विहीरीतील पाण्यात आढळून आले.

पाळसखेड पिंपळे येथील ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 26),
रामेश्वर आप्पासाहेब जाधव (वय 26) व सुनील आप्पासाहेब जाधव (वय 18) हे तिघे भाऊ बुधवारी रात्री जेवण करून 8 वाजण्याच्या सुमारास शेतात गव्हाच्या पिकाला बारी देण्यासाठी गेले. पाणी देण्यासाठी एकाने विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याला विद्युत धक्का बसून तो विहिरीत कोसळला. इतर दोघांनी त्याला वाचविण्यासाठी लगेच विहिरीत उडी घेतली. मात्र तीनही भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
रात्री उशीर झाला तरी तिघे घरी परतले नाही म्हणून जाधव कुटुंबीय चिंतेत पडले. मोबाईलवरील कॉल सुद्धा कोणीही उचलत नव्हते. म्हणून त्यांनी नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर मध्यरात्री 2 वाजता नातेवाईक शेतात गेल्यानंतर तिघेही विहिरीत बुडल्याचे निदर्शनास आले. माहिती मिळताच हसनाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह विहिरीतून बाहेर काढले. यानंतर राजूर येथे ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले
तीन महिन्यापूर्वीच झाला होता विवाह –
आप्पासाहेब जाधव यांना तीन मुले आहेत. त्यापैकी ज्ञानेश्वरचा तीन महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. इतर दोन मुले औरंगाबाद येथे कंपनीत काम करत होते. लॉकडाऊनपासून ते घरी आले होते. तीन कर्त्या मुलांच्या मृत्यूने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर गावात अनेकांनी या दिवाळीच्या सणासुदीला हा जाधव परिवारावर काळाचा घाला घातल्याने अनेकांनी हंबरडे फोडले असल्याचे सांगितले जाते आहे तर या तिघा भावांवर गुरुवारी दुपारी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close