जालना- कोरोनानंतरच्या परिस्थिती मध्ये रोजगारनिर्मिती हे सर्वात मोठे आव्हान आहे. असे प्रतिपादन प्रा डॉ कार्तिक गावंडे दि 23 मार्च रोजी कचरेवाडी ता जि जालना येथे अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या बौद्धिक सत्रात केले. पुढे बोलताना डॉ गावंडे असे म्हणाले की कोरोनामुळे आर्थिक अर्थव्यवस्थेला फार मोठा धक्का दिला असून मागील दोन्हीही वर्षी पिकवलेल्या फळबागांना भाव णं मिळाल्यामुळे व शेती क्षेत्राच्या उत्पादनाला स्थानिक मार्केटमध्येच विकावे लागले, अर्थ व्यवस्था उध्वस्त झाली, रोजगार बुडाला. ही रोजगार उभारणी अत्यंत महत्वाची आहे. समाज, शासन याबरोबरच तरुणांनी स्वप्रयत्नांनी रोजगार प्राप्ती करावी. असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप प्रा डॉ भुजंग डावकर यांनी केला. प्रारंभी या बौद्धिक सत्राचे अध्यक्ष डॉ भुजंग डावकर यांचे रा से यो चे कार्यक्रमाधिकारी प्रा अविनाश भालेराव यांनी तर प्रमुख वक्ते प्रा डॉ कार्तिक गावंडे यांचे स्वागत केले. या बौद्धिक सत्राचे सूत्रसंचालन स्वयंसेवक अभिजीत रणनवरे तर आभार स्वयंसेवक महेश जाधव याने मानले. याप्रसंगी डॉ मसूद अन्सारी,ग्रामस्थ, रा से यो स्वयंसेवक व कार्यक्रमाधिकारी यांची उपस्तिथी होती.