Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

जालना :जिल्हा कोषागार कार्यालयात कोषागार दिन साजरा



जालना दि.1- दि. 1 फेब्रुवारी 1965 रोजी महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा विभागाची स्थापना झाल्याच्या अनुषंगाने दरवर्षी 1 फेब्रुवारी हा कोषागार दिन म्हणून साजरा केला जातो. जालना येथील जिल्हा कोषागार कार्यालयात कोषागार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रम दिपप्रज्वलनाने उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, जालना श्री पुंडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी जिल्हा पुरवठा अधिकारी, जालनाच्या श्रीमती आर. एम. बसैय्ये यांनी कोषागार कार्यालयातील लेखा व वित्त विभागाची भूमिका अतिशय महत्त्वाचा घटक असून कोषागाराच्या कामकाजाबाबत सर्व उपस्थितीना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा कोषागार अधिकारी सचिन चं. धस, यांनी केले व त्यांनी कोषागार कार्यालयाचे कामकाज तसेच कोषागाराचे महत्त्व सांगून हा शासनाचा महत्वाचा घटक आहे असेही यांवेळी सांगितले. या कार्यक्रमात परिविक्षाधीन कोषागार अधिकारी निशांत पवार, , लेखाधिकारी श्री गलगुंडे, सेवानिवृत्त लेखाधिकारी श्री राउत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्याम मारोडे यांनी केले तर लेखा लिपीक व आभार प्रदर्शन दिनेश वाघ यांनी केले या कार्यक्रमास जालना कोषागार कार्यालयातील अपर कोषागारअधिकारी दिपक जयवळ, लेखाधिकारी श्री गवळी, उमेश कुलकणी, सूर्यकांत धोंगडे, मोहम्मद सोईफ उपकोषागार अधिकारी तसेच कोषागार कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद व जालना जिल्हयातील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेत असलेले विविध कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते असे जिल्हा कोषागार कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close