Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

जय श्रीराम! राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार

मुंबई : राज्यात आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर मनसेने नवीन मेगाप्लॅन आखला आहे. याची सुरूवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 1 ते 9 मार्च दरम्यान अयोध्येच्या दौरापासून होणार आहे. आज मनसेची आगामी निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांची या बैठकीला उपस्थिती होती. या बैठकीनंतर झालेल्या पञकार परिषदेत बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

हेही वाचा घटनात्मक आयोगास बोगस म्हणणारे मंत्री वडेट्टीवार राजीनामा द्या!मराठा क्रांती मोर्चाची मा


बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 9 मार्चला वर्धापन दिन असतो. अयोध्या दौऱ्याहून परतल्यानंतर राज ठाकरे पक्षाला संबोधित करणार आहे. 9 मार्चनंतर राज ठाकरे राज्यातील विविध भागांचा दौरा करणार आहे. तसेच, निवडणुका जवळ आल्यामुळे 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिलपर्यंत मनसे सदस्य नोंदणी करणार आहे, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा मराठा आरक्षणासाठी अख्खं गाव उतरलंय आंदोलनात:साष्टपिंपळगाववासीयांचा आत्मदहनाचा इशारा

मनसेची मराठी भाषा दिनाला स्वाक्षरी मोहीम : २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रज यांची जयंती असते. हा दिवस मराठा राजभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात यतो.

हेही वाचा अण्णा उपोषणावर ठाम:अण्णा हजारेंच्या मनधरणीसाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री राळेगणसिद्धीत, 30 जानेवारीपासून अण्णांचे उपोषण

मनसे हा दिवस सण, उत्सव म्हणून धुमधडाक्यात साजरा करणार आहे. या निमित्ताने मराठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाईल, असे नांदगावकर यांनी सांगितले आहे. त्या दिवशी, मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा, संस्थाचालक, मराठी प्रकाशक, संपादक, कवी, लेखक, खेळाडू यांचा सन्मान मनसे करणार आहे. मराठी वृत्तपत्रे आणि मराठी वृत्तवाहिन्या, नाट्य कलावंत आणि सिनेकलावंत यांचा सन्मान करण्यात येणार आहे , असे नांदगावकर यांनी सांगितले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close