Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

जय जय स्वामी समर्थ’ : कलर्स मराठीवर!

जय जय स्वामी समर्थ‘ : कलर्स मराठीवर!

: वेळेच्या भरधाव अश्वावर आरूढ होण्याची स्पर्धा आजच्या विज्ञान युगात अव्याहत सुरू आहे. जो तो भौतिक सुखांसाठी प्राण पणाला लावून धावतो आहे आणि परिणामी कमालीचा असुरक्षित, व्याधीग्रस्त, तणावपूर्ण आणि वैफल्यग्रस्त आयुष्य आजचा माणूस जगतो आहे. आजच्या पिढीच्या नशिबी आली आहे अफाट स्पर्धा आणि अवाजवी अपेक्षांचे ओझे… अशावेळी अत्यंत अस्वस्थ, उद्विग्न मनाला शांततेची, सकारात्मकतेची, आशेची आवश्यकता भासते… संकटकाळी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, दिशाहीन व्हायला होतं तेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन आपला तारणहार  होईल या विश्वासाने, श्रद्धेने आणि भक्तीभावाने. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असे अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी वाट चुकलेलयांना मार्ग दाखवला, त्यांचे मार्गदर्शक बनले… त्यांच्या दारी आलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशाच ब्रह्मांडनायक ‘श्री स्वामी समर्थ’ ह्यांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला…”भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” किंवा “अशक्यही शक्य करतील स्वामी” या अमृतमय शब्दांची शक्ती अद्वितीय आहे. असुरक्षित मनाला, जीवनाला आश्वस्त करणारी आणि संकल्प पूर्ण करण्याची शक्ती देणारी ही संजीवन वचनं आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात जिथे उद्याची शाश्वती नाही  तिथे विशेषत: तरुण पिढीला स्वामी समर्थ आणि त्यांचे तत्वज्ञान दिशादर्शक वाटत आहे… आणि याचे एकमेव कारण म्हणजे त्यांची उपासना कोणालाही कोणत्याही कर्मकांडात अडकवत नाही… नामस्मरण हीच पूजा आणि तोच यज्ञ हे त्यांचे सांगणे आहे. त्यांची वचने लाखो लोकांना आधार देतात… अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे…तेव्हा नक्की पहा ‘जय जय स्वामी समर्थ’ २८ डिसेंबरपासून सोम ते शनि रा. ९.३० वा. आपल्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर. शिरीष लाटकार लिखित या मालिकेची निर्मिती कॅम्सक्लब यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close