Subscribe to our Newsletter
महाराष्ट्र

तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवणं चुकीचं’:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


‘मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहितीही मुख्यमंत्र्य़ांनी दिली. मात्र, पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार शरसंधान साधलं. ‘सरकार चालवताना आमची जबाबदारी असते की न्यायाने वागणे. गेल्या काही महिन्यात गलिच्छ राजकारण सुरु. तपास निपक्षपातीपणे झाला पाहिजे. पण एखाद्याला आयुष्यातून उठवायचं म्हणून तपास होता कामा नये. गेल्या काही दिवसांपासून आम्ही म्हणू तिच पूर्व दिशा असल्याचं विरोधकांना वाटतं’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली

तपास व्यवस्थित होऊ द्या. तुमच्या काळातही हीच तपास यंत्रणा होती. ज्या पोलिसांवर तुम्ही अविश्वास दाखवत आहात. तुमच्या काळातही त्यांनीच तपास केला होता. मग आता अविश्वास कसा दाखवता? पोलीस हा सरकारचा कणा असतो, अशावेळी त्यांच्यावर अविश्वास दाखवणं चुकीचं आहे’, असं ही मुख्यमंत्री म्हणाले. कारण, पुणे पोलिसांच्या तपासावर भाजपकडून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पण तपास योग्य दिशेनं सुरु असल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीसांना टोला
सत्तेत कुणी किती लाचारी पत्करली ते इतिहासात लिहिलं जातं, असा टोला फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना लगावला होता. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “एकतर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आल्यानंतर खोट्याचे इमले रचले आणि देश विकायला काढला किंवा देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची नोंद होईल. याची सुद्धा त्यांनी नोंद ठेवावी आणि आरोप करताना थोडसं जबाबदारीचं भान ठेवावं”, असा सल्ला ठाकरे यांनी फडणवीसांना दिला आहे.
“त्यांची मनस्थिती समजू शकतो. समोर आलेलं एक चांगलं चित्र त्यांनी स्वत:च्याच कर्माने भंग केलं. सरकार पडेल सरकार पडेल असं म्हणत आता वर्ष लोटलं आहे पण ते काही पडत नाही. उलट आता आम्ही अधिक मजबुतीने काम करायला लागलो आहोत. महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात असताना इतर ठिकाणी त्याचं कौतुक होत आहे. पण तुमच्या मनात जी खदखद आहे ती जरुर काढा. सरकारचं काही चुकत असेल तर जरुर सांगा. पण कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करु नका”, अशा टोलाही ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close