Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

अपघातात रक्त सांडून जीव गमाविण्यापेक्षा रक्तदान करणे संपूर्ण मानव जातीसाठी महत्वाचे –पालकमंत्री आदिती तटकरे

अलिबाग, जि.रायगड:- अपघातात रक्त सांडून जीव गमाविण्यापेक्षा रक्तदान करणे, ही बाब संपूर्ण मानव जातीसाठी महत्वाची आहे, असे मत पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पनवेल तालुक्यातील कळंबोली येथे व्यक्त केले.
रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत वाहतूक शाखा, कळंबोली येथील रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या शुभहस्ते या रक्तदान शिबिराचे उद्धाटन संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल विभागीय पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पुरुषोत्तम कऱ्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, कळंबोली वाहतूक पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार, अभिजीत मोहिते तसेच पोलीस कर्मचारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रक्तदात्यांचे अभिनंदनही केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत रक्त संकलन केले गेले. तसेच जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी केली गेली. या शिबिरातील लाभार्थ्यांना “निर्माण डायग्नोस्टिक सेंटर” यांच्या वतीने प्रथमोपचार, सी. बी. सी. तपासणी, रक्तदाब, टेम्परेचर, शुगर, ऑक्सिजनची तपासणी यासह इतरही काही आजारांची मोफत तपासणी करुन तज्ञांकडून मोफत सल्ला देण्यात आला. तसेच प्रत्येक तपासणी करणाऱ्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या शिबिरास वाहतूक पोलीस कर्मचारी,स्थानिक विविध संघटनांचे पदाधिकारी आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close