Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

पळसखेडा येथील घटनेची चौकशी कराऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे महावितरणला आदेश

औरंगाबाद : पळसखेडा पिंपळे येथील संशयित विद्युत अपघातातील तीन तरुणांच्या मृत्यू प्रकरणी तातडीने सखोल चौकशी करावी. तसेच या प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ.नरेश गीते यांना दूरध्वनीवरून दिले आहेत.    पळसखेडा पिंपळे (ता.भोकरदन जि. जालना) येथे बुधवारी रात्री (१८ नोव्हेंबर) तीन भावांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे प्रसारमाध्यमातून प्रकाशित वृत्तांत म्हटले आहे. त्याची दखल घेऊन या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करावी. तसेच चौकशीच्या निष्कर्षानुसार कुणी दोषी आढळल्यास संबंधित अधिकारी वा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही डॉ.राऊत यांना या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने या प्रकरणाची चौकशी होणार आहे.

ReplyForward
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close