Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

बीड:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन

बीड:बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र शासनाचा तीव्र निषेध करत पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर तात्काळ कमी करण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले. बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महागाईच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले.  महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. सातत्याने होणारी पेट्रोल, गॅस सिलेंडरची दरवाढ ही सर्वसामान्यांनी परवडणारी नाही. केंद्र शासनाच्या निषेध करुन तात्काळ दर कमी करावेत अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष कमलताई निंबाळकर, अ‍ॅड.प्रज्ञा खोसे, माधुरी घुमरे, तालुकाध्यक्षा जयश्री वाघमारे, अनिता वाघमारे, शेख गुरलुखजहिन, वनिता चाळक, कुसूम भालेराव, राणीभाभी, ललिता शेरकर, स्वाती दुनघव, संताबाई खाडे, पुजा भिसे, रुपाली वाघमारे, रोहिनी केंडे, रुक्मीणीबाई चादर, वैशाली काकडे, विजूबाई खाडे, शालीनी दुनघव, राधा पाडोळे आदि उपस्थित होते. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close