Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

गिधाड प्रकल्पांसाठी चिरगाव वन राखीव म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे करण्याचे निर्देश

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत झाला निर्णय

अलिबाग,जि.रायगड – गेल्या दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून महाड येथील सिस्केप या पक्षी संवर्धन व पर्यावरण क्षेत्रात काम संस्थेच्या म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथील गिधाड संवर्धन प्रकल्पास आवश्यक असणारे संबंधित त्रेचाळीस हेक्टर वन शासनामार्फत आज राखीव करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय पालकमंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे व वनखात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीमध्ये घेण्यात आला.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान
गेल्या तेवीस वर्षांपासून सिस्केप संस्थेमार्फत पक्षीसंवर्धन व पर्यावरण क्षेत्रात रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी कार्य सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून म्हसळा तालुक्यातील चिरगाव या चव्वेचाळीस हेक्टर वनामध्ये गिधाड संवर्धनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प विविध सामाजिक संस्था व मान्यवरांच्या मदतीने अविरत सुरू आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यामध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने येथील सर्व गिधाडांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान संस्थेसमोर उभे राहिले होते .
हेही वाचाBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त


या निसर्ग चक्रीवादळामध्ये चिरगाव तालुका म्हसळा येथील वन पूर्णपणे नामशेष झाल्याने येथील गिधाडांनी अन्यत्र विहार सुरू केला होता, हे लक्षात घेऊन सिस्केप संस्थेमार्फत रायगडचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याकडे शिरगाव वन राखीव म्हणून घोषित करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून करण्यात आली होती, या संदर्भात आज पालकमंत्री कु.तटकरे यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये झालेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत संबंधित वन राखीव म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
हेही वाचा :मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्‌घाटन
या बैठकीस रोहा, ठाणे व श्रीवर्धन येथील वनवृत्त विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच रोहा वनवृत्त अधिकारी श्री. शेपट, सिस्केप संस्थेचे श्री.प्रेम सागर मेस्त्री, श्री.गणेश खातू उपस्थित होते.
या बैठकीत सिस्केप संस्थेमार्फत शिरगाव येथे सुरु असलेल्या गिधाड संवर्धन प्रकल्पाची माहिती चित्रफितीद्वारे उपस्थितांना देण्यात आली व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .

हेही वाचाGood News राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासून होणार सुरू
गिधाड प्रकल्पाची सध्याच्या परिस्थितीमध्ये असलेली आवश्यकता याबाबत श्री. मेस्त्री यांनी मंत्री महोदयांना व उपस्थित अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानुसार झालेल्या चर्चेतून हे क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आगामी काळात या परिसरामध्ये रोपवाटिका निर्माण करून या ठिकाणी असलेल्या अन्य पक्षांच्या संवर्धनाकरिताही करावयाच्या मोहिमेबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली.

हेही वाचा अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरिता 510 पदांना मंजूरी

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close