Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

पाच वर्षे रडत बसण्यापेक्षा आत्ताच योग्य सरपंच निवडावा

विहामांडवा / युनूस पठाण

राज्यातील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. येत्या 23 डिसेंबरपासून त्यासाठी अर्ज भरण्यास बंद प्रारंभ होत आहे. त्यानंतर 15 जानेवारीस प्रत्यक्ष मतदान होणार आहे.    याबाबत सविस्तर वृत्त असे की,स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पैसा कमविण्याचा अड्डा असा काहीचा विचार सध्या पक्का झालेला आहे. त्यामुळे सरपंच पदाचे दावेदार हे मतदारांना दारू पाजुन ,काहींना पैसे देऊन निवडून येतात, त्यांच्या मताची किंमत करतात व पाच वर्ष स्वतःचे घर भारतात त्यामुळे अश्या लोकांना तर नागरिकांनी मतं मागण्यासाठी दारावर ही येऊ देऊ नये.दोन दिवसांची निवडणूक असते पण पाच वर्षे आपल्याला सर्वांना भोगावे लागते. त्यामुळे गावातील नागरिकांनीही विचारपूर्वकच मतदान करून कर्तव्यदक्ष असणाऱ्या उमेदवारांना पसंती द्यायला पाहिजे, यामागील काळामध्ये जे घडले आहेत ते विसरून जायला पाहिजे, तसेच इच्छुक उमेदवारांनी ही ग्रामपंचायत मध्ये पैसा कमीने हे डोक्यात ठेवून निवडणूक करणार असाल तर हे पण खूप वाईट आहे. ज्यांच्याकडे वेळ आहे, ज्यांच्याकडे कुवत आहे, ज्ञान आहे ,पैसा आहे, आपल्या गावाचे काहीतरी चांगले काम करण्याची ताकद आहे, अशाच सुशिक्षित नागरिकांनीच या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे, हौवशा लोकांनी या क्षेत्रात येऊ नये, व आपल्या गावाचा नाश करू नये, कारण ग्रामपंचायत सदस्य होणे जरी सोपे असले तरी, काम करणे खूप अवघड आहे, ज्यांना परिपूर्ण अभ्यास असेल त्यांनीच ग्रामपंचायत सदस्य व्हायला पाहिजे , व मतदार बांधवांनी पण त्यांनाच निवडून द्यायला पाहिजे,ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर त्यांना ग्रामपंचायत ची कारकिर्दी समजलच पाच वर्षे जातात, त्यांना ग्रामपंचायत च्या कामकाजाविषयी काही कळत नाही अशांना तर जनतेने अजिबात निवडून द्यायला नको, ज्यांच्याकडे फुल टाईम आहे, गावासाठी काहीतरी करायची इच्छा असते, सर्व गोष्टी उपलब्ध आहेत, समाज सेवा करण्याची आवड आहे, अशाच उमेदवारांना जनतेने विचार करूनच निवडून द्यायला पाहिजे, पैसे खाणाऱ्या तसेच दुसऱ्याचा कोणाचातरी राग काढायचा म्हणून ग्रामपंचायत रिंगणात उतरू नये, कारण ग्रामपंचायत पवित्र क्षेत्र असते, हे एक पवित्र मंदिर आहे, इथं पवित्र भावना आणि व पवित्र विचारानेच यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या गावाचा विकास करण्यासाठी सोयीस्कर जाईल, त्यामुळे गावातील जनतेने पवित्र विचार असणाऱ्या व्यक्तींनाच निवडून देऊन आपल्या गावाचा विकास करायला पाहिजे. पाच वर्षे रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीमध्ये विचार करून विना मोबदला मतदानाचा हक्क  बजावला पाहिजे,

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close