Subscribe to our Newsletter
मराठवाडा

मंठा वाटुर रस्त्याच्या दुरुस्ती कामाची आमदार राजेश राठोड यांच्याकडून पाहणी

mh20live Network

मंठा / अनिल बा खंदारे

मंठा ते वाटुर या राष्ट्रीय महामार्गावर जीवघेणे खड्डे पडले होते या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना आमदार राजेश राठोड यांनी संबंधित कार्यकारी अभियंता यांना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेप्रमाणे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून त्यांनी सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून काम दर्जेदार करण्याच्या सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. मंठा ते वाटुर रस्त्याची मागील अनेक वर्षापासून अक्षरशः चाळणी झाली होती,

त्यामुळे अनेक अपघात घडून काहीना आपला जीव गमवावा लागला. वाहनधारकांना शारीरिक त्रास होऊन शरीराचे अनेक अवयव निकामी झाले, या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी आमदार राजेश राठोड यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच केली होती त्यांनी जनतेच्या मागणीची दखल घेत कार्यकारी अभियंत्यांना चांगलेच खडसावले होते. दोन-तीन दिवसात या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करावी असे आदेशही त्यांनी संबंधित विभागाला दिले होते. त्या अनुषंगाने मंठा ते वाटुर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली असून आमदार राजेश राठोड यांनी या कामाच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी करून काम दर्जेदार करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी मंठा नगरपंचायतचे उपाध्यक्ष सिराजखान पठाण, विजय राठोड, सचिन राठोड यांच्यासह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close