Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणकरिअर

बडकवस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचा अभिनव प्रयोग शाळेतच साकारले भाजीपाला व फळे धुण्याचे यंत्र


सिल्लोड – कोरोना काळात सर्वत्र  नकारात्मक वातावरण तयार झालेले असताना सिल्लोड तालुक्यातून एका वेगळ्या उपक्रमाची बातमी समोर आली आहे . तालुक्यातील दुर्गम भागात असणारी बडकवस्ती शाळा ही एक  प्रयोगशील शाळा म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात परिचित आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांनी एक अभिनव प्रयोग साकारलेला आहे . या छोट्या वैज्ञानिकांनी कोरोना काळात भाजीपाला आणि फळे धुण्याचे यंत्र तयार केले आहे. उत्तम आरोग्यासाठी रोग प्रतिकार शक्ती वाढवणे गरजेचे आहे . त्यासाठी आपल्या आहारात भाजीपाला आणि फळे यांचा समावेश असणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे मुळे पालकांनी फळे आणि भाजीपाला बाजारातून आणणे खूप कमी केले आहे. कारण बऱ्याच लोकांचा फळांना व भाज्यांना स्पर्श होत असतो. त्यामुळे पालकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. नेमकी हीच बाब विद्यार्थ्यांनी हेरली. मुलांनी त्यांच्या पालकांच्या मनातील भीती घालवून त्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फळांची व भाज्यांची किती गरज आहे हे पटवून देण्यासाठी व  त्यांचा ताण हलका करण्यासाठी हे उपकरण तयार केले. परिसरातच अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून त्यांनी हा प्रयोग आकारास आणला.      मुलांनी तयार केलेल्या यंत्राच्या माध्यमातून फळे आणि भाजीपाला एकदम स्वच्छ धुतल्या जातो. त्यानंतर फळांना सुकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगळीच शक्कल लढवली. हेअर ड्रायर च्या मदतीने विद्यार्थ्यांनी फळे आणि भाजीपाला सुकवून पूर्ण निर्जंतुक केला. या यंत्राचा प्रत्यक्ष वापर केल्यानंतर पालकांची सुद्धा मनोवृत्ती बदललेली आहे. बऱ्याच पालकांनी मुलांच्या या कृतीचे कौतुक केले आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी मुलांनी जो संदेश दिला तो त्यांच्यापर्यंत कळाल्याचे कबूलही केले. मुख्य म्हणजे हा प्रयोग साकारताना विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेचीही पूर्ण काळजी घेतली होती .तापमान मोजणे ,  सॅनिटायझर टायझर आणि मास्कचा वापर आदी बाबींचा पूर्ण वापर केला आहे .        अनुजा तांदळे , साईराज कुदळे , चेतन खिल्लारे ,  आदित्य बडक , दीपक बडक , रूपाली सोनवणे , आशिष सोनवणे , सौरभ राकडे या छोट्या वैज्ञानिकांनी हे उपयुक्त उपकरण तयार केले.शाळेचे मुख्याध्यापक विशाल टिप्रमवार व पाहुणी शिक्षिका प्रिया टिप्रमवार यांनी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले आहे.  विद्यार्थ्यांच्या या यशस्वी प्रयोगाची शिक्षणाधिकारी जैस्वाल व गटशिक्षणाधिकारी दिलीप शिरसाठ, केंद्रीय मुख्याध्यापक रामचंद्र मोरे, केंद्रप्रमुख शामराव फुसे,  सरपंच दत्ता बडक, अध्यक्ष नारायण बडक , उपाध्यक्ष आबाराव बडक आणि ग्रामस्थांनी स्तूती केली आहे .सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रयोग बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि या माध्यमातून  भविष्यातील या छोट्या वैज्ञानिकांवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close