औरंगाबाद, : इंदिरा आयव्हीएफ औरंगाबाद केंद्र येथे प्रगत तंत्रज्ञान व गर्भ दात्याच्या मदतीने विवाहाच्या २३ वर्षांनंतर जोडप्याने यशस्वी गर्भधारणा केली. ३९ वर्षीय सरिता (नाव बदललेले) आणि तिचा पती रघु (नाव बदललेले) २३ वर्षांपूर्वी विवाह झाल्यानंतर मूल होण्याचा प्रयत्न करत होते. चार वेळा आयव्हीएफ केल्यानंतर देखील त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले, ज्यानंतर ते शहरातील इंदिरा आयव्हीएफ केंद्रामध्ये आले.
इंदिरा आयव्हीएफमधील तपासणीनंतर असे निदर्शनास आले की, महिला जोडीदारामध्ये पातळ एंडोमेट्रियमसह ओवेरिन रिजर्व (अंड्यांची अपुरी संख्या) कमी झाले होते आणि पतीचे वीर्य मापदंड देखील खराब होते. तसेच सरिताला तीव्र उच्च रक्तदाब, मधुमेह, हायपोथायरॉईडचा त्रास देखील होता आणि तिने आतड्यांसारख्या ओटीपोटातील अवयवांमध्ये अतिरिक्त फुफ्फुसीय क्षयरोगाचा प्रकार अॅब्डोमिनल कोच्ससाठी उपचार घेतला होता. याआधी त्यांनी इतर दवाखान्यात चार अयशस्वी आयव्हीएफ उपचार घेतले होते, त्यामुळे त्यांना कोणत्याही फलदायी परिणामाची भीती वाटत होती. पण, इंदिरा आयव्हीएफमधील अनुभवी डॉक्टरांनी त्यांच्याशी सल्लामसलत केली आणि त्यांना उपचार प्रक्रिया सुरू करण्यास प्रेरित केले.
या जोडप्याच्या केसमधून निदर्शनास आले की, त्यांच्यामधील अंडी व शूक्राणूंच्या अभावामुळे त्यांना स्वत:हून गर्भधारणा करता येणार नाही आणि त्यासाठी त्यांना दाता चक्रावर अवलंबून राहावे लागेल. सरितावर हिस्टेरोस्कोपिक लॅटरल वॉल मेट्रोप्लास्टी करण्यात आली, जी गर्भाशयावर केली जाणारी पुनर्रचनात्मक प्रक्रिया आहे, स्कार टिश्यू सोडण्यात आले आणि नंतर फॉली कॅथेटर ८ दिवसांसाठी हेरंट्रायूटरिन कॅव्हिटीमध्ये ठेवण्यात आले. यानंतर जलद रिकव्हरीसाठी प्लेटलेट-रिच प्लाझ्मा (पीआरपी)चे इंजेक्शन देण्यात आले. हे दात्याचे चक्र असल्याने दान केलेल्या गर्भासह गर्भ हस्तांतरण केले गेले आणि सरिताच्या एंडोमेर्टियलची जाडी ८ मिमी असताना तिच्या गर्भाशयात दोन चांगल्या दर्जाचे ब्लास्टोसिस्ट गर्भ हस्तांतरित केले गेले. हस्तांतरणानंतर १६व्या दिवशी बीटा-ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रॉपिन (बीटा-एचसीजी) चाचणीने गर्भधारणेची पुष्टी केली. ज्यानंतर रुग्णाची तीव्र उच्च रक्तदाबाची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता अत्यंत सावधगिरीने त्याचे निरीक्षण केले गेले.
या प्रक्रियेबाबत सांगताना इंदिरा आयव्हीएफ औरंगाबादमधील डॉ. धोंडिराम भारती म्हणाले, ”काही विशिष्ट केसेसमध्ये विशिष्ट जन्मजात दोषांमुळे झालेल्या समस्या, कमी ओवेरियन रिजर्व, तसेच विद्यमान वैद्यकीय स्थितींसंदर्भात सहाय्यक प्रजननात्मक तंत्रज्ञान सोल्यूशन देते. येथे रूग्णांवर प्रथम स्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता उपचार करण्यात आला आणि त्यानंतर गर्भ हस्तांतरण सारख्या प्रक्रिया करण्यात आल्या, ज्यामुळे त्यांना गर्भधारणा होऊ शकली. आम्ही नेहमीच जोडप्यांना वंध्यत्व समस्येसाठी वेळेवर उपचार करण्याचा सल्ला देतो. या केसमध्ये जोडप्याच्या विवाहाला २३ वर्षे उलटली होती आणि आम्ही उपचार सुरू केला तेव्हा महिला रूग्णाचे वय ३९ वर्षे होते. या वयामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेहव थायरॉईड आजार यांसारख्या इतर आरोग्यविषयक आजारांमुळे उपचार प्रक्रिया अधिक जटिल होती. योग्य वयात व वेळेवर उपचार केल्याने सकारात्मक परिणामाची शक्यता अनेक पटीने वाढते हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.”
सर्व प्रयत्नांसह सरिता व रघुचे बाळासह आई-वडिल बनण्याचे स्वप्न त्यांच्या ५व्या आयव्हीएफ आणि गर्भ दात्यासह पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्ण झाले.