Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

भारतातील पहिले ऑनलाईन महानुभाव संत संमेलन संपन्न

mh20live .com
मुंबई | 

भारतातील पहिले ऑनलाईन संत संमेलन औरंगाबाद शहराच्या माध्यमातून आयोजित केले होते. जगात सर्वत्र कोरोना या महामारीने थैमान घातलेले असताना वेळेचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने हे संमेलन महत्त्वाचे ठरले. संपूर्ण भारत लॉकडाऊन मध्ये असताना भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असणाऱ्या धार्मिक चळवळीची ही एक महत्त्वाची भूमिका आहे. कोरोनाच्या गंभीर पार्श्वभूमीवर 21 ते 30 मे दरम्यान ग्लोबल महानुभाव संघ, महानुभाव आश्रम, श्रीकृष्णमंदिर, औरंगाबाद व ईश्वर ज्ञान युट्युब चॅनल द्वारा आयोजित करण्यात आले होते. यात भारतातील विविध राज्यातील संत सहभागी झाले होते. हे संमेलन सलग 10 दिवस 10 विविध विषय घेऊन त्यावर सखोल चर्चा मंथन करण्यात आले. विषय पुढील प्रमाणे

1) महिलांचे अधिकार अणि महानुभाव पंथ
2) चतुर्वीध साधन
3) महानुभाव साहित्यातील जीवनमूल्ये
4) स्वामींची प्रयत्नवादाची शिकवण
5) स्वामींच्या समतेचे स्वरूप
6) मराठी – महाराष्ट्र – महानुभाव
7) महानुभवांचा तेजस्वी इतिहास
8) श्रीमद्भगवत गीता आणि महानुभाव पंथ
9) स्मृती स्थळातील आचार विचार
10) महानुभाव पंथ

साहित्य, समाज, इतिहास, राजकारण, कोरोनाचे संकट, धर्म, संप्रदाय, देशसेवा, राष्ट्र जागृती, सर्वधर्मसमभाव, तत्त्वज्ञान, भारतीय दर्शन, भारतीय संस्कृती, संस्कृत साहित्य, अध्यात्म अशा विविध मुद्द्यांवर सखोलपणे सकारात्मक चर्चा करण्यात आली.
भारतातील सुमारे 50 संत यात सहभागी झाले होते. या संमेलनासाठी मठाधिपती महंत सुभद्राबाई कपाटे (आत्या) यांची प्रेरणा व साहित्याचार्य संतोषमुनी शास्त्री कपाटे यांचे मार्गदर्शन लाभले. ईश्वर ज्ञान युट्युब चॅनलचे संचालक ई. श्री. सुदर्शनमुनी कपाटे यांनी आयोजन केले तर मोहन बाभूळगावकर हे या संमेलनाचे समन्वयक होते. ई.श्री. धर्मराज महानुभाव, ई.श्री. सुनीलराज बिडकर, ई.श्री. अमोल कोल्हेकर, मोहन कपाटे, अभिनव कपाटे यांनी संमेलनाची तांत्रिक बाजू सांभाळली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close