Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

रविवारी भारतीय दलित पँथर राज्यस्तरीय पुनर्बाधनीची बैठक

 
औरंगाबाद /mh20live Network
रविवारी  भारतीय दलित पँथर राज्यस्तरीय पुनर्बाधनीची बैठक सामाजिक आणि राजकीय स्थिती अत्यंत विदारक आणि भयानक बनलेली आहे, अन्याय अत्याचाराने प्रचंड उचल खालली आहे. खैरलांजी पासून ते हथरसपर्यंत दलित महिलांवर अमानुषपणे अत्याचार होत आहे. ज्यांच्याकडून न्याय मागायचा तेच अत्याचार करण्यामध्ये आघाडीवर आहे. देशात आणि राज्यात धर्मांध शक्तीने उन्माद माजवला आहे. अशा परिस्थितीमध्ये दलित-शोषित- वंचित आदिवासी-भटके विमुक्त , ओबीसी, अल्पसंख्यांकांची बाजू घेऊन मैदानात उतरुन बेडरपणे लढणाऱ्या पँथरची लढाऊ युवकांची फळी उभी करण्याची अत्यंत आवश्यक आहे. आणि ती काळाजी गरजही बनली आहे.

म्हणूनच ही गरज ओळखून पँथरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी औरंगाबाद येथे दिनांक १ नोव्हेंबर २०२० रोजी रविवारी दुपारी ११.३० वा. कॉ. व्हि डी. देशपांडे हॉल येथे ऐतिहासिक आणि महत्वपुर्ण बैठक होणार या बैठकीस राज्यभरातून प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती बैठकीचे प्रमुख संयोज अॅड. रमेशभाई खंडागळे, दशरथ लोहबंदे, रामचंद्र माने, अॅड. शिवाजी आदमाने, प्रा.अमर पांडे, अशोक वानखेडे, प्रा. अनंत लांडगे, प्रा. बाबुराव डोंगरदिवे, अशोक कांबळे, ओमपाल चावरिया, साजेद मौलाना, प्रा. वाघमारे, यांनी दिली आहे. या बैठकीस युवक, विद्यार्थी, आणि कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सामिल व्हावे असे अवाहन रामेश्वर निकाळजे , संभाजी साबळे, सिध्दार्थ ठोकळ, माणिक पगडे, साईनाथ जंगम, मधुकर घोरपडे, सुंदर साळवे यांनी केले आहे. प्रमुख संयोजक

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close