Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

इंडिया शेल्टर ने मिळवला “हाऊसिंग फायनांस कंपनी लेन्डिंग फॉर अफोर्डेबल हाऊसिंग” अवॉर्ड

इंडिया शेल्टर ने मिळवला “हाऊसिंग फायनांस कंपनी लेन्डिंग फॉर अफोर्डेबल हाऊसिंग” अवॉर्ड

 अलीकडेच इंडिया शेल्टर फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड ला द इंक्लूजिव फायनांस इंडिया अवॉर्ड येथे “हाऊसिंग फायनांस कंपनी लेन्डिंग फॉर अफोर्डेबल हाऊसिंग” या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. या सचिवालय सादरीकरण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

किफायतशीर किंमतीत स्वतःचे घर मिळविण्यासाठी  संधीच्या  शोधात असलेल्या, कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गृह कर्जे उपलब्ध करुन देण्यासाठी  इंडिया शेल्टर फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेडने  सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

“हाऊसिंग फायनांस कंपनी लेन्डिंग फॉर अफोर्डेबल हाऊसिंग”  पुरस्काराची निवड संस्थेची पोहोच,मालमत्ता गुणवत्ता,विकास, तसेच देशातील गरीब लोकांना मदत करत त्यांना त्यांच्या हक्काच्या,सुरक्षित आणि सुधारित घरामध्ये प्रवेश मिळवून देत देशाच्या विकासासाठी योगदान देण्याची त्यांची वचनबद्धता या बाबींवर अवलंबून करण्यात आली.

माननीय श्री. अनुराग ठाकूर, मिनिस्ट्री ऑफ स्टेट फायनान्स अँड कॉर्पोरेट अफेयर्स ,गवर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या हस्ते, श्री. अनिल मेहता, सीईओ, इंडिया शेल्टर फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आम्ही सुमारे ७०,००० कुटुंबांना मदत केली असून आम्ही जे कार्य करतो, ते सर्वात जास्त प्रभावित आर्थिक उपक्रमांपैकी एक आहे. आम्ही १४ राज्यातील सुमारे १,३०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि भविष्यात आम्ही संपूर्ण देशात आमची उपस्थिती दर्शवू अशी आशा आहे, असे श्री. अनिल मेहता, यावेळी म्हणाले.

२०१० पासून शहरातील फर्स्ट-जनरेशन कुटुंबांना गृह कर्जे  मिळवून देण्यासाठी इंडिया शेल्टर फायनांस कॉर्पोरेशन लिमिटेड आघाडीवर आहे. त्यांनी सहजरित्या,सुलभतेने,माध्यम आणि गरीब लोकांची मदत करणारी त्रास-मुक्त कर्ज व्यवस्थापन प्रक्रिया, स्थापित करण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न केले आहेत. आणि येणाऱ्या काही वर्षात दुप्पट प्रगती करण्याचे त्यांचे लक्ष आहे. इंडिया शेल्टर सर्वसाधारण कमाई असणाऱ्या, भारतीय नागरिकांचे,स्वतःचे घर घेण्याचे सर्वात मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करते. इंडिया शेल्टर लोकांचे स्वप्न पूर्ण करत, घर खरेदी करण्यासाठी किंवा त्यांचे अस्तित्त्वात असलेले घर बांधण्यासाठी/ सुधारण्यासाठी/ नूतनीकरणसाठी नेहमीच सहकार्य करते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close