Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

भारत बंद! जाणून घ्या; मुंबईसह राज्यात काय सुरू असेल आणि काय बंद?

8 डिसेंबर रोजी भारत बंद! जाणून घ्या; मुंबईसह राज्यात काय सुरू असेल आणि काय बंद?

मुंबई: केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी उद्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. बळीराजाच्या या बंदला देशभरातील शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला असून महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद राहणार आहेत. यावेळी कांदा, मका, बटाटा आणि इतर शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. माथाडी कामगारही काम बंद ठेवून या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. तर शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा म्हणून कोकणात रिक्षा आणि टॅक्सीही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या राज्यातील जनतेला फळ, भाज्या मिळणार नाहीत. उद्या मुंबईसह महाराष्ट्रात कुठे कुठे आणि काय काय बंद ठेवण्यात येणार आहे, याचा घेतलेला हा आढावा. )

माथाडी कामगार बंदमध्ये सहभागी होणार
केंद्र सरकारच्या कृषी व पणन कायद्या विरोधात राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील तमाम माथाडी कामगार व व्यापाऱ्यांनी उद्या होणाऱ्या संपात भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदे, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व बाजार समितीच्या संचालकांची आज नवी मुंबईत बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

केंद्र सरकारने कृषी व पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि कष्टाची कामे करणाऱ्या माथाडी कामगारांची कामे कमी झाल्यामुळे या घटकांवर आणि शेतकऱ्यांवर बेकारीचे संकट ओढविले आहे. केंद्र सरकारच्या कामगार, व्यापारी व शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱे तमाम माथाडी कामगार आणि व्यापारी मंगळवार ( 8 डिसेंबर) रोजी संपावर जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस नरेंद्र पाटील ,आमदार शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप व व्यापारी असोसिएशनने पदाधिकारी व बाजारसमीतिचे संचालक यांनी सांगितले.

काय काय बंद असणार?
राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या,
कांदा, मका, बटाटासह इतर शेत मालाचा लिलाव
राज्यातील बाजार पेठा
दूध, फळे, भाजीपाल्यांचा पुरवठा होणार नाही
कोकणात रिक्षा टॅक्सी बंद
मुंबईत दुकानं, खासगी संस्था, खासगी कार्यालये बंद राहतील
बाजार समितीच्या सर्व ट्रान्सपोर्ट सेवा बंद राहणार
काय बंद नसेल
अत्यावश्यक सेवा
मुंबईतील बेस्ट
मुंबईत टॅक्सी-रिक्षा
मुंबईत दूध, भाजीपाला पुरवठा, लग्न समारंभ सुरू राहणार
नवी मुंबईत दूध,औषधची दुकाने सुरू राहणार
नवी मुंबईत NMMT बस सेवा सुरू राहणार
नवी मुंबईत अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
या पक्षांचं समर्थन
उद्या होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय लोकशाही पार्टीने पाठिंबा दिला आहे.
या पक्षांचा पाठिंबा नाही
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलेला असतानाच भाजप, रयत क्रांती संघटना आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांनी मात्र पाठिंबा दिलेला नाही.

s/o tv9

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close