Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

एमजीएम विद्यापीठाला स्वतंत्र संशोधन केंद्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा


औरंगाबाद /प्रतिनिधी

ज्ञान आणि कौशल्ये यांची सांगड घालूनच विकासाचा मार्ग धरता येऊ शकतो. एमजीएमचे हे टेक्निकल एक्सलन्स सेंटर याची पायाभरणी करणारे ठरू शकते. याच अनुषंगाने एमजीएमला स्वतंत्र संशोधन केंद्र देण्याची घोषणा करत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या ३८ व्या वर्धापन दिनानिमित्त जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील ‘टेक्निकल एक्सलन्स सेंटर’च्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, डॉ. पी. एम. जाधव, एमएससी सॉफ्टवेअर कंपनीचे उपाध्यक्ष श्रीधर धर्मराजन, उद्योजक उमेश दाशरथी, डॉ. राजेंद्र अभंगे, कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, प्रताप बोराडे, प्राचार्य डॉ. हरिरंग शिंदे, डॉ. गीता लाटकर, डॉ. सुधीर कदम, डॉ. नितीन कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. गडकरी पुढे म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था चिंता करण्यासारखी आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याचा जीडीपीत ३० टक्के वाटा आहे. हा वाटा ४० टक्क्यांपर्यंत नेऊन निर्यात ६० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून ११ कोटी रोजगार तयार झाले आहेत. स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात कोणते धोरण राबवता ते महत्त्वाचे आहे. महात्मा गांधी द्रष्टे नेते होते. देशात अधिक उत्पादनाची गरज असल्याचे त्यांचे मत होते. स्वदेशी, स्वावलंबन या गांधी विचाराला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड दिल्यास देशाचे आर्थिक चित्र बदलेल, असे गडकरी म्हणाले. स्वदेशी म्हणजे मागासलेपण नसून आधुनिक ते स्वीकारताना स्वदेशी नाकारणे योग्य ठरणार नाही. भारतात अगरबत्तीची काडीसुद्धा तैवान, इंडोनेशियातून आयात होते. हा चार हजार कोटींचा व्यापार होता. अधिकचा कर लावून ही आयात थांबवली. आता भारतातच काड्यांची निर्मिती होऊन २५ लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, अगरबत्तीच्या काड्यासाठी योग्य बांबू नसल्याने आता बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. आयात थांबवून निर्यात वाढल्यास देशाच्या उत्पन्नात वाढ होईल’, असे गडकरी म्हणाले.
एमजीएम संस्थेचे अध्यक्ष कमलकिशोर कदम म्हणाले, महात्मा गांधी मिशनचा मागील 38 वर्षांचा विस्तार सर्वांच्या सहकार्यामुळे पूर्ण होऊ शकला.
अत्यंत नवीन संकल्पना अंकुशराव कदम यांनी पूर्णत्वास नेल्या. एखाद्या शिक्षण संस्थेचे सर्वात मोठे भांडवल निस्वार्थ वृत्तीने काम करणारा मनुष्यबळ असतो आणि असे निस्वार्थ कर्मचारी लाभणे एमजीएमचे भाग्य आहे. सध्या सर्वच संस्था अडचणींचा सामना करत आहेत. पण, त्यांचे रूपांतर संधीत करून वाटचाल करणे गरजेचे आहे.
एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, एमजीएममध्ये तंत्रज्ञान उत्तमता केंद्राची उभारणी होणे, हे केवळ एमजीएमच्या विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले असलेले नवदालन आहे. यातून अधिक सक्षम अभियंता घडतील, यात शंका नाही. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीच्या गरजेनुसार कौशल्ये शिकवण्यासाठी हे केंद्र कटीबद्ध असेल. त्यामुळे, विद्यार्थ्यांनी या केंद्रातील विविध सॉफ्टवेअर, तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.
डॉ.गीता लाठकर म्हणाल्या, हे परिवर्तन, विकास आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान जग आहे. आशा परिवर्तनाच्या काळात आपण शैक्षणिक संस्था म्हणून बदलायला हवे, ही गरज आम्ही लक्षात घेतली. दर 20 मिनिटांनी या जगातील माहिती दुप्पट होत आहे. त्यामुळे अशा माहितीच्या युगात तितके ह सक्षम अभियंता तयार व्हावेत, अशी तयारी शैक्षणिक संस्था म्हणून आपल्याकडून होणे गरजेचे आहे. जर तुम्हाला शिक्षक बनायचे असेल तर तुम्ही कायम शिकत राहायला पाहिजे. अभियंता बनायचे असल्यास कायम अद्ययावत असायला हवे. नेमक्या याच गरज ओळखून आम्ही हेक्सॉगॉन, एमएससी आणि एससिग्मा यांच्या सहकार्याने या केंद्राची उभारणी केली आहे. यात विविध अभ्यासक्रम शिकवले जातील.
सुदर्शन लाठकर (सीईओ, एससिग्मा) म्हणाले, मी अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना शिक्षण आणि इंडस्ट्री यात असलेला असलेला कौशल्यत्मक भेद माझ्या लक्षात आला. तेव्हाच मी ठरवले होते की, भारतीय शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केला होता आणि हे केंद्र त्याच प्रयत्नाचा भाग आहे.
उमेश दाशरथी, (संस्थापक, ऋचा इंडस्ट्री) म्हणाले, हे केंद्र केवळ विद्यार्थी, एमजीएम किंवा मराठवाड्यासाठीच नव्हे तर जगभरासाठी महत्वाचे आहे. मॅकेन्झिच्या अहवालानुसार, 20 असे तंत्रज्ञान आहेत जे जगाच्या संपूर्ण भविष्यावर प्रभाव टाकू शकतात. त्यांचे अध्ययन आणि अध्यापन या केंद्रात होणार आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. जगातील ऑटोमोबाईल जगताचा व्यवसाय 4 ट्रीलीयन डॉलरवर पोहचला आहे. अशा या काळात त्यानुरूप अभ्यासक्रम एमजीएममध्ये या माध्यमातून सुरू होणे, गौरवाची बाब आहे. यावेळी राजेंद्र अभंगे ( सीईओ, गॅब्रेल) आणि श्रीधर धर्मराजन (कार्यकारी उपाध्यक्ष) यांनीही भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन सरफराज अली, प्रा.दीपा देशपांडे यांनी तर आभार डॉ. विजया मुसांडे यांनी मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close