Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पोट साफ होण्यासह; ‘या’ गंभीर आजारांपासून होतो बचाव

रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पोट साफ होण्यासह; ‘या’ गंभीर आजारांपासून होतो बचाव
स्वयंपाकघरात अशा अनेक वस्तू असतात या वस्तूंच्या सेवनानं शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. त्यातीलच एक म्हणजे लसूण आहे. जेवणाला चव येण्यासाठी पदार्थांमध्ये लसणाचा वापर केला जातो. लसणात अनेक औषधी गुणधर्म आहेत.

रिकाम्यापोटी लसूण खाल्यास शरीर निरोगी राहतं. सध्या कोरोनाकाळात सगळ्यांनाच आजारी पडण्याची भीती वाटते. अशा स्थितीत जर तुम्ही घरगुती उपायांनी स्वतःला फिट ठेवले तर सतत डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. चला तर मग जाणून घेऊया रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे फायदे.

पचनक्रिया सुधारते

जे लोक सकाळी लसूण खातात. त्यांची पचनक्रिया नेहमी व्यवस्थित राहते. यामुळे पोटाचे विकार दूर होतात. वजन कमी करण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशी ठरतं. रक्त गोठण्याची समस्या अनेकांना उद्भवते. लसूण खाल्ल्यानं रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे ब्लड क्लोटिंग थांबतं.

गंभीर आजारांपासून बचाव

पाण्यासोबत कच्चा लसूण सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्यानं विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. शरीर डिटॉक्स करण्याचा हा सोपा मार्ग आहे. याद्वारे तुम्ही मधूमेह, कॅन्सर, डिप्रेशन यांसारख्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठीही लसणाचं सेवन फायदेशीर ठरतं. एक ते दोन आठवडे लसूणचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. सोबत यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील संतुलित राहते.

हाडांसाठी फायदेशीर

हाडे मजबूत व्हावीत, यासाठी नियमित कच्चे लसूण खायला हवीत. यामुळे तुमच्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. ज्यामुळे ऑस्टियोपोरोसिससारखे गंभीर आजारांचा धोका कमी होतो. याव्यतिरिक्त लसणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. दातदुखीचा त्रास असेल लसणाचे सेवन फायदेशीर ठरते. दातांमध्ये दुखणे सुरु झाल्यास लसणीचा तुकडा गरम करुन दुखत असलेल्या दाताखाली ठेवा.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

लसूणात अ‍ॅलिसिन नावाचं कम्पाउंड असतं. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या कमी होते. याचे योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणात सेवन केल्यास रोग प्रतिकारक क्षमता देखील वाढते. रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असल्यास गंभीर आजारांपासून लांब राहता येतं.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप– या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. mh20live.com याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close