Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

विज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासून बेदम मारहाण, परतूर तालुक्यातील रोहिणा येथील घटना, दोघा भावा विरुद्ध गुन्हा दाखल

  
परतूर/असलम कुरेशी

परतुर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ दत्तात्रेय भोंगाने आज दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रवीवारी एका कर्मचार्‍यांसह रोहिणा येथे वीज बिलाच्या थकीत वसुलीसाठी गेले होते. यावेळी त्यांना भगवान पाटोळे आणि नारायण पाटोळे या दोन भावांनी काळे फासून लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले आहे.याप्रकरणी परतुर पोलिसांनी आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे हे करीत आहेत.

दरम्यान मनसे च्या वतीने विज वितरण कंपनी कार्यालय परतुर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की.परतूर तालुक्यातील बागायतदार शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता वीज वितरण कंपनीचे कर्मचारी विज पुरवठा कट करीत आहे,
परतूर तालुक्यातील सर्व गावांमध्ये तीन दिवसापासून विज वितरणचे अधिकारी-कर्मचारी शेतकऱ्यांचे कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे म्हणून कार्यालय अंतर्गत कार्यक्षेत्रा मध्ये येणारया सर्व गावातील शेतकऱ्यांची तोडलेली वीज जोडनी तत्काळ करून द्यावी,
शेतकऱ्यांचा पाणी देण्याचा मोसम असल्यामुळे गहू हरभरा ऊस केळी आदी पिकांना शेतकरी पाणी देत आहे, विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकरयांचे मोठे नुकसान होणार आहे, कृषी पंप धारक शेतकऱ्यांना पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा खंडित करणे सुरू आहे,करीता शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन निर्णय घेई पर्यंत तोडलेला वीज पुरवठा तत्काळ जोडून द्यावा,
दोन दिवसापासून खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करून देण्याबाबत कारवाई करावी, असे या निवेदनात म्हटले आहे, प्रकाश सोळंके,महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालना,कृष्णा गोवर्धन सोळंके,रामजी नवल,आत्माराम जगताप, भारत शेळके
माऊली केव्हारे आदीच्या या निवेदनावर स्वक्षरया करण्यातआलेल्या आहेत.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close