Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते कम्प्युटर आणि शिवण प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन


औरंगाबाद:इंडिया पल्सेस अँड ग्रेन असोसिएशन (आयपीजीए) या भारतातील डाळींच्या व्यापार व उद्योगातील मध्यवर्ती संस्थेने आपल्या सातत्यपूर्ण सीएसआर उपक्रमांचा भाग म्हणून भोकरदन तालुक्यातील सहा शाळांमध्ये कम्प्युटर व शिवण प्रशिक्षण केंद्रे सुरू करून ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण पुरवण्याच्या कामात योगदान दिले आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आज जवखेड्यातील (खुर्द) दिवंगत दशरथबाबा विद्यालयामध्ये कम्प्युटर व शिवण प्रशिक्षण केंद्रांचे उद्घाटन केले. या समारंभाला भोकरदन-जाफराबाद चे आमदार  संतोष रावसाहेब दानवे, आयजीपीए चे अध्यक्ष  जितू भेडा, आयजीपीए चे संस्थापक संचालक प्रवीण डोंगरे, आयजीपीएचे उपाध्यक्ष. बिमल कोठारी आणि आयजीपीएचे मानद सचिव सुनील सावला यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

माननीय मंत्री  रावसाहेब दानवे उद्घाटनाच्या वेळी म्हणाले, “मराठवाडा हा कायमच दुष्काळग्रस्त भाग राहिला आहे आणि आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना कम्प्युटरचे मूलभूत प्रशिक्षण तसेच शिवणाचे मूलभूत प्रशिक्षण द्यायचे आहे, जेणेकरून या प्रशिक्षणाचा वापर करून ते आपल्या पायावर उभे राहू शकतील, उपजीविकेचे मार्ग शोधू शकतील. हाच विचार घेऊन आम्ही इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनला भेटलो आणि असोसिएशनने आमच्या विनंतीला प्रतिसाद देत कम्प्युटर आणि शिवण प्रशिक्षण केंद्रे स्थापन करण्याचा प्रकल्प हाती घेतला. आयपीजीएने यापूर्वीही २०१६ मध्ये, भोकरदन मधील १० गावांत जलपुनरुज्जीवनाचा विशाल प्रकल्प राबवून, आम्हाला सहाय्य केले आहे. याचा फायदा या भागातील लाखो शेतकऱ्यांना झाला आहे. मी स्वत: आणि मोरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ ट्रस्ट व छत्रपती शिवाजी महाराज समिती ट्रस्टचे पदाधिकारी, आम्ही सगळे, हे प्रकल्प राबवल्याबद्दल आणि या भागातील शेतकरी कुटुंबांना सहाय्य केल्याबद्दल, आयजीपीएचे, आभारी आहोत.”

आयपीजीएचे अध्यक्ष  जितू भेडा म्हणाले, “माननीय मंत्री  रावसाहेब पाटील दानवे यांच्या उदात्त उपक्रमाला सहाय्य करता आले आणि ग्रामीण भागातील तरुणांना शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे त्यांचे उद्दिष्ट पुढे नेता आले ही आयपीजीए साठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. ही कम्प्युटर आणि शिवण प्रशिक्षण केंद्रे विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देतील. यामुळे तळागाळातील रोजगार क्षमता वाढवण्यास नक्कीच मदत होईल.”

आयपीजीएचे संस्थापक संचालक  प्रवीण डोंगरे म्हणाले, “माननीय मंत्री  रावसाहेब दानवे यांचा हा उपक्रम नक्कीच उत्कृष्ट आहे आणि या महान कार्यात मदत करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. डाळींच्या संपूर्ण मूल्यसाखळीत काम करणारी एक संस्था म्हणून, आम्ही शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या कोणत्याही कार्यात वा उपक्रमात सहाय्य करण्यास कायम सज्ज आणि इच्छुक आहोत.”

आयपीजीएचे उपाध्यक्ष  कोठारी म्हणाले, “डाळींच्या व्यापारातील मध्यवर्ती संस्था म्हणून, आत्तापर्यंत सीएसआरच्या माध्यमातून केलेल्या कामाचा आम्हाला अभिमान वाटतो. शिक्षण, सर्वांसाठी अन्न व पोषण,  रोजगार आणि ग्रामीण भारताचे कल्याण यांवर भर देणाऱ्या अधिक चांगल्या भारताचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी काम करणाऱ्या केंद्र व सर्व राज्य सरकारांना मदत करण्यास आम्ही कायम सज्ज आहोत. यापूर्वीही आयपीजीए ने भोकरदन मधील १० गावांमध्ये जलपुनरुज्जीवन प्रकल्प यशस्वीरित्या राबवला आहे आणि याचा शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे. आमच्या या कामामुळे आमच्या सारख्या आणखी काही संस्थांना पुढे येऊन योगदान देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी आशा आम्हाला वाटते.”

मराठवाड्यातील ग्रामीण भागातील सहा शाळांमध्ये कम्प्युटर आणि शिवण प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याच्या प्रकल्पाला आयपीजीएने सहाय्य पुरवले आहे. एकूण १७५ कम्प्युटर्स आणि ९० मोटरवर चालणारी शिलाई यंत्रे पुढील शाळांमध्ये बसवण्यात आली आहेत:

१.    स्वर्गीय दशरथबाबा विद्यालय, जवखेडा  (खुर्द) : ३५ कम्प्युटर्स सह कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र आणि १८ मोटराइझ्ड शिलाई यंत्रांसह शिवण प्रशिक्षण केंद्र.

२.    श्री शिवाजी विद्यालय,  भोकरदन : ३५ कम्प्युटर्स सह कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र आणि १८ मोटराइझ्ड शिलाई यंत्रांसह शिवण प्रशिक्षण केंद्र.

३.    मोरेश्वर विद्यालय, राजूर : १८ मोटराइझ्ड शिलाई यंत्रांसह शिवण प्रशिक्षण केंद्र.

४.    मराठवाडा विद्यालय, भोकरदन: ३५ कम्प्युटर्ससह कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र.

५.    श्री शिवाजी विद्यालय,  धावडा : ३५ कम्प्युटर्स सह कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र आणि २० मोटराइझ्ड शिलाई यंत्रांसह शिवण प्रशिक्षण केंद्र.

६.    संत ज्ञानेश्वर विद्यालय,  हसनाबाद : ३५ कम्प्युटर्ससह कम्प्युटर प्रशिक्षण केंद्र आणि २० मोटराइझ्ड शिलाई यंत्रांसह शिवण प्रशिक्षण केंद्र.

आयपीजीए विषयी :

भारतातील डाळी आणि धान्य व्यापार व तत्संबंधी उद्योगांची मध्यवर्ती संस्था असलेल्या इंडिया पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशनचे (आयपीजीए) ४००हून अधिक प्रत्‍यक्ष व अप्रत्यक्ष सभासद आहेत, ज्यांत व्यक्ती, कॉर्पोरेट्स तसेच स्थानिक डाळ व्यापारी आणि प्रोसेसर्स संघटनांचा समावेश आहे. या सदस्यांच्या माध्यमातून ही संघटना डाळींचे उत्पादन, प्रक्रिया, धान्यसाठवणूक आणि आयात उद्योग अशा संपूर्ण मूल्यसाखळीचा भाग असलेल्या १०,००० लाभार्थींशी जोडली गेली आहे.

भारतीय डाळी आणि धान्य उद्योग व व्यापार जागतिक स्तरावरील स्पर्धेत टिकून राहण्यास सक्षम बनावा, व हे ध्येय साध्य करताना भारताच्या अन्न व पोषण सुरक्षेलाही बळ मिळावे हे आयपीजीएचे लक्ष्य आहे. आयपीजीए स्थानिक कृषी-व्यापार क्षेत्रामध्ये नेतृत्वाची भूमिका साकारण्याची वभारतीय बाजारपेठेत सहभागी घटकांमध्ये तसेच भारत व त्यांच्या परदेशातील सहका-यांमध्ये सुदृढ नातेसंबंधांची जोपासना करण्यासाठी जागतिक स्तरावर अधिक सक्रिय भूमिका निभावण्याची जबाबदारी आयपीजीएने आपल्या शिरावर घेतली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close