Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

2020 वर्षात कोरोना वर आधारीत, “जिते INDIA हमारा” हे खास गीत ठरले प्रचंड प्रभावी ….. !!

ये कोरोना लडाई हमें जितनी है..हौसला हमें बुलंद रखना है..जिते हम तुम , जिते दुनिया , जिते INDIA हमारा..

https://www.facebook.com/Mh20live-102121051801545


औरंगाबाद :प्रख्यात गायक,संगीतकार प्रमोद सरकटे यांच्या भारदस्त Narrative आवाजात सुरू होणारा हा व्हीडीओ आणि कोरोना लॉक डाऊन च्या वातावरणात कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी व मनोबल वाढविण्यासाठी गीतांचे यथोचित शब्द, चाल ,संगीत व व्हीडीओ तील अनेक मन हेलावून टाकणारी तसेच स्फूर्ती देणारी दृष्य खूपच परिणामकारक होते , ज्याचा प्रभाव लाखो लोकांनी LOCKDOWN काळात अनुभवला.
पद्मश्री अनुप जलोटा , पद्मश्री पं.सुरेश वाडकर यांचा मनोबल वाढविणारा सुरेल आवाज व श्रवणीय स्वरांनी “जिते INDIA हमारा” हे गीत भारदस्त झाले आहे.
Youtube, FB, Whatsap, sharing च्या माध्यामातून लाखो VIEWERS चा प्रतिसाद खूपच परिणामकारक होता.
विशेष म्हणजे सर्वांचे मनोबल वाढविण्यासाठी यामध्ये मुंबई चे तडफदार पोलिस उपायुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा या गीतामध्ये विशेष सहभाग व त्यांचे आवाहन , तसेच पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांचा संदेश ,आणि मुंबई हून पो.उपमहानिरीक्षक हरिष बैजल, पो.उपमहानिरिक्षक नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांचा विशेष सहभाग खूप प्रभावी वाटतो.
अनेक नामांकित वैद्यकीय संस्था व नामांकीत डाॅक्टर्स यांचा सहभाग पण महत्वपूर्ण आहे. डाॅ .प्रविण सूर्यवंशी (एमजीएम), डाॅ समीर कदम, डॉ गिरीष गाडेकर (एमजीएम), डाॅ किर्ती सरकटे(एमजीएम),
डाॅ.विजय सुरासे(ज्युपिटर मुंबई), डाॅ विजयेंद्र व डाॅ तनुजा इंगळे (लंडन), डाॅ अमोल कुलकर्णी (धूत हाॅस्पीटल), डाॅ.रंजळकर (आयएमए ),डाॅ गाडे (आयएमए), डाॅ निकाळजे (एमजीएम), डाॅ हांडू(लंडन),डाॅ नागरे ,डाॅ कस्तुरी बाराळे , डाॅ तोष्णीवाल ,अभिनेते विजय कदम आदींचा सहभाग कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविणारा आहे..
झी टीव्ही सारेगमप फेम गायिका अमृता नातू, पार्श्वगायिका योगिता गोडबोले यांनी मुंबई हून खास ऑनलाईन गीत ध्वनिमुद्रित करून या गीतामध्ये मधुरता आणली आहे. या गीताचे निर्माता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांचे दमदार गायनासोबतच प्रमोद सरकटे यांच्या लंडन मधील शिष्या लावण्या पाटील व पुजा पाला या पण गीतामध्ये सहभागी आहेत. गीतकार ,संगीतकार प्रमोद सरकटे
म्युझिक अरेंज, गायन व व्हीडीओ संकल्पना स्वराज सरकटे यांची तसेच व्हीडीओ एडीटींग, मास्टरींग युवराज सरकटे यांनी केलेय. म्युझिक अरेंज टेक्निकल सपोर्ट राहुल जाधव यांनी केलेय.
सोशल मेडीया, यू ट्यूब वर या व्हीडीओ साॅन्ग चा प्रोमो पण गाजला.. “जिते india हमारा” हे व्हीडीओ गीत सर्वांना आवडणारे व महत्वपूर्ण संदेश देणारे ठरले व आजही कोरोनाच्या परिस्थिती ची जाणीव या गीताचा व्हिडीओ बघताना होत असते. प्रसिद्ध गायक व संगीतकार प्रमोद सरकटे व मराठवाडय़ाचा Rockstar स्वराज सरकटे यांची ही अप्रतिम संकल्पना म्हणजे लॉक डाऊन मधील एक महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य ठरले.
लमहो की किमत क्या है, आज वक्त ने बता दिया
इन्सान होने का मतलब हमे, एक व्हाईरस ने सिखा दिया..
या व्हिडीओ गीता मधील ओळी प्रमाणेच
ही परिस्थिती सर्वानी अनुभवली आहे.

येत्या नवीन वर्षात संपूर्णपणे करोना मुक्त वातावरण
आपण अनुभवणार आहोत अशी आशा करूया….. क्यों की जरूर ये कोरोना लडाई ” जितेगा इंडिया हमारा”…….

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close